वीटभट्टी कामगार पनवेलात

By Admin | Published: October 14, 2014 10:54 PM2014-10-14T22:54:35+5:302014-10-14T22:54:35+5:30

पावसाळा संपला की पनवेल परिसरातील वीटभट्टी व्यवसाय तेजीत सुरु होतो. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात सुरु असलेले बांधकाम व्यवसाय व त्यासाठी लागणाऱ्या विटा हा महत्वाचा घटक आहे.

Veetabhatti Kamgar Panvel | वीटभट्टी कामगार पनवेलात

वीटभट्टी कामगार पनवेलात

googlenewsNext

नवी मुंबई : पावसाळा संपला की पनवेल परिसरातील वीटभट्टी व्यवसाय तेजीत सुरु होतो. पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात सुरु असलेले बांधकाम व्यवसाय व त्यासाठी लागणाऱ्या विटा हा महत्वाचा घटक आहे. याच लघुउद्योगासाठी थेट कर्नाटकवरून हंगामी कामगार पनवेलमध्ये दाखल झाले आहेत.
खारघर, कामोठे, पनवेल, ग्रामीण भाग आदि ठिकाणी मोठ्याप्रमाणात वीटभट््या पहावयास मिळतात. पाच ते सहा महिने चालणारा हा लघुद्योग संपूर्णता कामगारांवर अवलंबून असतो. माती काढणे, तिच्यावर प्रक्रिया करून ती सुकविणे, सुकविल्यानंतर माती साच्यात भरून तिला विटेचा आकार देणे. त्या विटांना नंतर भाजण्यासाठी एकत्र करणे आदी कामे महत्त्वाची असतात.
हे सर्व काम केल्यानंतर प्रत्येक आठवड्याला कामगारांना मजुरी दिली जाते, असा हा दैनंदिन घटनाक्रम आहे. या दरम्यान पाच ते सहा कामगारांची कुटुंबे एकत्र रहातात. महाराष्ट्रासह कर्नाटकातून हे मजूर पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर करीत असतात. वीटभट्टी मालकांनाही या धंद्यात मोठा नफा प्राप्त होतो. पनवेल शहरात अशा प्रकारच्या अनेक कामगारांचे लोंढे मोठ्याप्रमाणात दाखल होत आहेत.
पावसाळ्यात शेती व्यवसाय, त्यानंतर उन्हाळी व हिवाळी मोसमात वीटभट्टी व्यवसाय हे त्यांचे ठरलेले वेळापत्रक आहे. एक हजार विटामागे त्यांचे उत्पन्न ठरत असल्याने जास्तीत जास्त विटा तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. कामगारांचे संपूर्ण कुटुंब यावेळी त्यांच्यासोबत राहून त्यांना मदत करत असते. (प्रतिनिधी)

Web Title: Veetabhatti Kamgar Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.