Join us

भाजीपाला झाला स्वस्त

By admin | Published: May 01, 2015 1:20 AM

तीव्र उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबई, नवी मुंबईकरांना भाजीपाल्याचे दर आवाक्यात आल्यामुळे दिलासा मिळाला आहे.

नवी मुंबई : तीव्र उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबई, नवी मुंबईकरांना भाजीपाल्याचे दर आवाक्यात आल्यामुळे दिलासा मिळाला आहे. मुंबईतील मागणीपेक्षाही आवक जास्त असल्यामुळे भाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक व गुजरातवरूनही काही प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत आहे. मुंबई, नवी मुंबई व उपनगरांमधील तापमान मागील काही दिवसांमध्ये प्रचंड वाढले आहे. तीव्र उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उकाड्यामुळे भाजीपाला खराब होऊन बाजारभाव वाढत असतात. परंतु या वर्षी आवक चांगली असल्यामुळे बाजारभाव आवाक्यात आले आहेत. उन्हाळ्याची सुटी, गावाकडील लग्न व इतर कामांमुळे नागरिक गावी गेले आहेत. 400-450 टेम्पोंची आवक पुरेशी होऊ शकते. परंतु सद्य:स्थितीमध्ये ५०० किंवा त्यापेक्षा जास्त वाहनांची आवक होत आहे. यामुळे बाजारभाव घसरू लागले आहेत. गत महिन्यामध्ये होलसेल मार्केटमध्ये १८ ते ३८ रुपयांना विकली जाणारी भेंडी आता ८ ते २४ रुपयांवर आली आहे. गवार ३६ ते ४६ रुपयांवरून १४ ते २० रुपयांवर आली आहे. इतर सर्व वस्तूंचे दर आवाक्यात आले आहेत. किरकोळ मार्केटमध्येही सर्व प्रकारच्या भाज्या ३० ते ६० रुपये किलो दराने उपलब्ध आहेत. एपीएमसी व किरकोळमधील बाजारभाव भाजीमार्च एप्रिलकिरकोळभेंडी१८ ते ३८८ ते २४४० ते ६०दुधी१० ते १४८ ते १२४०फरसबी३६ ते ४०३० ते ३६४० ते ६० गवार३६ ते ४६१४ ते २०५० ते ६०घेवडा२० ते ३०२० ते २४४० ते ६०कारली३० ते ३४२० ते २६४० कोबी४ ते ८४ ते ६३२ ते ४०सिमला मिरची२६ ते ३०१८ ते २०४०शेवगा शेंग१५ ते २०१२ ते १६२८ ते ३२टोमॅटो१० ते १६८ ते १६३० ते ३५च्सध्या पुणे, नाशिक, सांगली, सोलापूर, सातारा येथूून भाजीपाला मुंबईत येत आहे. कर्नाटक व गुजरात येथून १५ टक्के भाजीपाल्याची आवक होत आहे. यंदा आवक चांगली असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध होईल, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.