राहुल वाडेकर, तलवाडाआधीच उल्हास नि त्यात फाल्गुन मास असाच काहीसा प्रकार सध्या महागाईच्या बाबतीत दिसून येत आहे. आधीच सारे दर गगनाला भिडले असताना वाढलेले पेट्रोल, डीझेलचे दर, बदललेले हवामान आणि पावसाच्या अनियमितपणामुळे नियमीत जेवणात लागणारा भाजीपालाही महाग झालेला आहे. एरवी २० ते २५ रुपये किलो मिळणाऱ्या भाज्या सरसकट ८० ते १०० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने बाजारात जाणाऱ्या महिला भाजीपाला महाग गं बाई म्हणत रिकाम्या हाताने परतू लागल्या आहेत.यंदा तीव्र उन्हाळा व त्यात पावसाळ्यातही जून महिना पावसाविना कोरडा गेला व जुलैच्या आठवडाभरापासून पावसाने संततधार कायम ठेवल्याने शेतात भाजीपाल्याची योग्य तशी लागवड झालेली नाही. त्यात पावसास सुरूवात झाल्याने भाजीपाला तयार होण्या आधीच तो आता खराब हऊ लागल्याने भाज्यांचे दर महाग झाल्याचे दिसून येत आहे. सगळाच खर्च वाढल्याने व्यापारीही अव्वाच्या सव्वा दर आकारत आहेत.
भाजीपाला महाग गं बाई!
By admin | Published: July 19, 2014 12:33 AM