पावसामुळे भाज्यांच्या दरात घसरण, शेवगा शंभरीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:06 AM2021-09-13T04:06:20+5:302021-09-13T04:06:20+5:30
मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक झाली आहे; पण पावसामुळे भाजीपाला भिजल्याने भाजीपाल्याच्या दरात १० रुपयांची घसरण झाली ...
मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक झाली आहे; पण पावसामुळे भाजीपाला भिजल्याने भाजीपाल्याच्या दरात १० रुपयांची घसरण झाली आहे. तर आवक कमी असल्याने शेवगा शंभरी पार गेला आहे.
मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये नाशिक सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर येथून जास्त प्रमाणात भाजीपाला येतो; परंतु काही दिवसांपूर्वी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. या भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक वाढली; पण काही भाज्या पावसाने भिजल्या, तर काहींना चिखल लागल्याने भाजी लवकर खराब होऊ लागली. त्यामुळे आता शेतकरी स्वस्तात भाज्यांची विक्री करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे भिजलेल्या भाजीपाल्याच्या गाड्या येत असून त्यामुळे भाजीपाला दर कमी झाले आहेत.
- श्रीकांत काटे, भाजी विक्रेता, चेंबूर
भाजीपाल्याचे उत्पादन वाढल्याने काही दिवसांत भाजीपाला दरात घट झाली होती. भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाजीपाला दरात घट झाली आहे.
-अमृत शिंदे, भाजी विक्रेते
आठवडाभरात भाजीपाला आवक वाढली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात १० रुपयांची घट झाली असून ग्राहकांसाठी चांगले दिवस आले आहेत.
-लक्ष्मी काळे, ग्राहक
भाजी दर
टोमॅटो - ३०
मिरची - ४०
भेंडी - ४०
पालक - १०
मेथी - १०
शेपू - १०
कोबी - ४०
फ्लॉवर - ८०
लालमठ - १०
शेवगा - १००
----------------
फळे (प्रतिकिलो)
सफरचंद - १०० ते १२०
संत्री - ६० ते ८०
पेरू - ५०
केळी - ४० ते ५०