मुंबईत भाजीपाल्याचे दर वाढले, आवक झाली कमी; फरसबी, शेवगा, दोडका, घेवडा शंभरीच्या पुढे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 11:08 AM2021-06-18T11:08:59+5:302021-06-18T11:09:23+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यापासून आवक कमी होत आहे. प्रतिदिन ४०० ते ४५० वाहनांची आवक होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : राज्यभर सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईत भाजीपाल्याची आवक कमी झाली असून, बाजारभाव वाढले आहेत. किरकाळ मार्केटमध्ये फरसबी १२० ते १४० रुपये किलो दराने विकली जात असून, शेवगा, दोडका, घेवड्याचे दरही शंभरीच्या पुढे गेले आहेत.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील आठवड्यापासून आवक कमी होत आहे. प्रतिदिन ४०० ते ४५० वाहनांची आवक होत आहे. यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. गत आठवड्यात होलसेल मार्केटमध्ये ३५ ते ५५ रुपये दराने विकला जाणारा आवळा ५० ते ५५ रुपये किलोवर गेला असून, किरकोळ मार्केटमध्ये ७० ते ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. फरसबीचे दर ८० ते १०० वरून १०० ते १२० वर पोहचले आहेत.
मुंबईत पुणे, सातारा, दक्षिणेकडील राज्य, नाशिक व इतर ठिकाणावरून भाजीपाल्याची आवक सुरू आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे दर वाढले आहेत.
होलसेल व किरकोळ मार्केटमधील भाजीपाल्याचे दर
वस्तू १० जून (एपीएमसी) १७ जून (एपीएमसी) १७ जून (किरकोळ)
भेंडी १५ ते ४० २२ ते ५० ५० ते ६०
फरसबी ८० ते १०० १०० ते १२० १२० ते १४०
फ्लॉवर १४ ते १६ १४ ते २२ ५० ते ६०
घेवडा ३५ ते ४० ४५ ते ५५ १०० ते १२०
शेवगा शेंग ४० ते ५० ६० ते ७० ८० ते १००
दोडका ३६ ते ४० ५० ते ६० १००
वांगी २४ ते ३० ३० ते ५० ७० ते ८०