पावसामुळे भाजीपाल्याचे दर कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 06:08 AM2020-08-08T06:08:16+5:302020-08-08T06:08:49+5:30
ग्राहकांनी फिरवीली पाठ; बाजार समितीमध्ये ग्राहक संख्या घटल्याने शिल्लक राहतोय माल
नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. मुंबई व नवी मुंबई परिसरातील अनेक किरकोळ विक्रेत्यांनी व्यवसाय बंद ठेवल्याने ग्राहकांची संख्या कमी झाली असून २० ते ३० टक्के दर कमी झाले आहेत. काही प्रमाणात माल शिल्लक रहात आहे.
गेले दोन दिवस राज्यभर मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे गुरूवारी बाजार समितीमध्ये फक्त २६७ वाहनांमधून भाजीपाला विक्रीसाठी आला होता. परंतु मुंबईमधून किरकोळ विक्रेते खरेदीसाठी कमी आल्याने २० टक्के माल शिल्लक राहिला होता. शुक्रवारी ही फक्त २६६ वाहनांची आवक झाली आहे. ग्राहकांची संख्या कमी असल्याने २० ते ३० टक्के दर कमी झाले आहेत. एपीएमसीमध्ये दर घसरल्याने त्याचे परिणाम किरकोळ मार्केटमध्येही झाले असून ग्राहकांना काही प्रमाणात भाजीपाला स्वस्त मिळू लागला आहे. पुढील काही दिवस दर कमीच राहण्याची शक्यता आहे.
भाजीपाल्याचे एपीएमसी व किरकोळ मार्केटमधील दर पुढील प्रमाणे
भाजी ३१ जुलै ७ आॅगस्ट ७ आॅगस्ट किरकोळ
भेंडी १६ ते ३० १० ते २६ ३५ ते ४०
दुधी भोपळा १२ ते १८ १० ते १६ ३० ते ४०
फरसबी ५० ते ५५ ३० ते ३६ ४० ते ५०
गवार ४० ते ४६ ३० ते ४० ५० ते ६०
घेवडा ३६ ते ४२ ३० ते ४० ५० ते ६०
कारली २० ते ३० १८ ते २४ ३५ ते ४०
कोबी १० ते १६ १० ते १४ २५ ते ३०
शेवगा शेंग ४० ते५० ३० ते ४० ५० ते ६०
वांगी २० ते २५ १६ ते २० ४० ते ५०
राज्यभर मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे मुंबईमधील रस्त्यांवर किरकोळ भाजी विक्री करणाऱ्यांचा व्यवसाय बंद आहे. यामुळे ग्राहकांची संख्या कमी झाल्याने दर कमी झाले असून दोन तीन दिवस अशीच स्थिती राहिली.
- शंकर पिंगळे,
संचालक,
भाजीपाला मार्केट