Join us

मुंबईतील भाजीपाला पुरवठा सुरळीत, गवारसह भेंडीची भाववाढ सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 5:26 AM

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये सोमवारी ३२७ ट्रक व टेंपोची आवक झाली आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये सोमवारी ३२७ ट्रक व टेंपोची आवक झाली आहे. समाधानकारक आवक झाल्यामुळे मुंबई व नवी मुंबईकरांचा भाजीपुरवठा सुरळीत झाला आहे. फरसबीचे दर नियंत्रणात आले असून गवारसह भेंडीचे दर मात्र अद्याप कमी झालेले नाहीत.राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व कोल्हापूर, सांगलीमधून महापूर याचा फटका मुंबईतील भाजीपाला पुरवठ्यावर झाला होता. दक्षीणेकडील राज्यातून येणारा भाजीपालाही बंद झाल्यामुळे भाववाढ सुरू झाली होती. सोमवारी बाजारसमितीमध्ये ३२७ वाहनांची आवक झाली झाली असून एक आठवड्यापुर्वी फक्त २४५ वाहनांची आवक झाली होती. समाधानकारक आवक झाल्यामुळे त्याचा परिणाम बाजारभावावरही झाला आहे. फरसबीचे दर प्रतिकिलो ९० ते १२० रूपयांवरून ७० ते ९० रूपये झाले आहेत. टोमॅटो ३६ ते ५० वरून २६ ते ३६ रूपये किलो एवढे झाले आहेत. गवारची आवक कमी झाली असल्यामुळे दर वाढले आहेत. सोमवारी एपीएमसीमध्ये गवार ६० ते ८० रूपये किलो दराने विकला जात होता. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ८० ते १०० रूपयांवर गेले आहेत.भाजीपाल्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी पुणे, नाशिक व गुजरातवरून मोठ्याप्रमाणात माल मागविला जात आहे. सोमवारप्रमाणे आवक राहिली तरी पुढील आठवड्यात भाव काही प्रमाणात नियंत्रणात येतील अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

टॅग्स :भाज्यामुंबई