ऐन गणपती सणाला भाजीपाला महागला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 02:20 AM2020-08-22T02:20:18+5:302020-08-22T02:20:25+5:30

भाजीपाल्याची आवक घटल्याने भाजीपाला दरात वाढ झाली आहे.

Vegetables became more expensive during Ain Ganpati festival | ऐन गणपती सणाला भाजीपाला महागला

ऐन गणपती सणाला भाजीपाला महागला

Next

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला असून, त्याचा परिणाम भाजी वाहतुकीवर झाला आहे. भाजीपाल्याची आवक घटल्याने भाजीपाला दरात वाढ झाली आहे.
मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यांतून भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये नाशिक, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर येथून जास्त प्रमाणात भाजीपाला येतो; परंतु काही दिवसांपूर्वी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागांतील भाजीपाल्याचे आणि पिकांचे नुकसान झाले आहे. या भागांतून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक घटल्याने त्याचा परिणाम मुंबईकरांच्या खिशावर होत असून, भाजी महाग झाली आहे.
चेंबूर येथील भाजी विक्रेते अमित काटे यांनी सांगितले, गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे भाजीपाल्याच्या गाड्या येत नसून भाजीपाला कमी येत असल्याने दर वाढले आहेत. भाजीपाल्याची आवक घटली आहे; परंतु जर भाजीपाल्याचा पुरवठा आणखी काही दिवसांत सुरळीत झाला नाही, तर भाजीपाल्याचे दर आणखी वाढू शकतात.
>भाजी आताचे दर पूर्वीचे दर
टोमॅटो ३० ते ४० २० ते ३०
मिरची ६० ते ८० ४० ते ६०
ढोबळी मिरची ३० ते ४० २० ते ३०
वांगी ६० ते ७० ४० ते ५०
भेंडी ४० ते ६० ३० ते ४०
कारले ५० ते ६० ३० ते ४०
कोबी ४० ते ६० ३० ते ३५
फ्लॉवर ६० ते ८० ४० ते ५०
चवळी भाजी जुडी १५ ते २० १०
लालमाठ १५ ते २० १० ते २०
पालक १५ ते २० १० ते १५
मेथी २० ते ४० ३० ते ४०\
>भाजीपाल्याचे उत्पादन वाढल्याने काही दिवसांत भाजीपाला दरात घट झाली होती. पण पावसामुळे भाजीपाल्याच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भाजीपाल्याची आवक घटल्याने भाजीपाला दरात वाढ झाली आहे.
- अंकुश शिंदे, भाजी विक्रेते
लॉकडाऊन काळात भाजीपाला महाग झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांत स्वस्त झाला होता. आठवड्याभरात पाऊस वाढल्याने भाजीपाला कमी येत असून प्रत्येक भाजीच्या दरात किलोमागे १५ ते २० रुपयांची वाढ झाली आहे.
- पुष्पा काळे, ग्राहक

Web Title: Vegetables became more expensive during Ain Ganpati festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.