लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इंधन भडक्याने आधीच संतापलेल्या सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकारने दिलासा दिला नसून, उलट आता सामान्यांचे बजेट आणखी कोलमडणार आहे. भाजीपाला, फळे व दैनंदिन गरजेच्या वस्तूंची वाहतूक करणाऱ्या टेम्पो मालकांनी भाडेदरात टनामागे १५० रुपयांची वाढ केली आहे. यामुळे भाजीपाला, फळे किमान १० टक्के महागणार असून, जनता महागाईमध्ये आणखी भरडली जाणार आहे.मुख्य बाजारपेठांतून विविध भागांत भाजीपाल्याचा पुरवठा एका टनापासून ते ६ टन क्षमतेच्या टेम्पोंद्वारे होते. या टेम्पोच्या मालकांनी भाडेदरात वाढ केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समित्यांतूनउप बाजारात व किरकोळ बाजारपेठांमध्ये भाज्यांची वाहतूक करणाºयांनी ही दरवाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकाला भाजीपाल्यासाठी किलोमागे रोज किमान २ ते ५ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
भाडेवाढ असोसिएशनची नाहीअसोसिएशनने भाडेवाढ केलेली नाही. पण नवी मुंबई ते दादर या अंतरासाठी ३ टनाच्या टेम्पोचे भाडे जे आधी १,९०० ते २,००० रुपये होते, ते आता २,३०० ते २,४०० रुपये करण्यात आले आहे. डिझेल महागल्यामुळेच टेम्पो मालकांनी स्वत:हून दर वाढवले. टेम्पोमालक व भाजीचे किरकोळ व्यापारी यांच्यातील सामंजस्याने हे दर वाढवण्यात आले. डिझेल महागत राहिल्यास आम्हाला भाडेवाढ करावीच लागेल.- सॅमसन जोसेफ, मुंबई टेम्पो असोसिएशनचे सचिव
मोदी सरकारकडून वाढदिवसाची भेट मिळणार?केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी व पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंधन जीएसटीखाली आणणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे. पण तो निर्णय प्रत्यक्ष कधी होणार, हा प्रश्नच आहे. मोदी सरकारला उद्या, शनिवारी चार वर्षे होताना केंदाने अबकारी करात तर भाजपाशासित राज्यांनी व्हॅटमध्ये कपात करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे.
विजेची दरवाढ आणि टंचाईहीऐन उन्हाळ्यात वीजनिर्मितीसाठी लागणाºया कोळशाची कमतरता औष्णिक वीज केंद्रांना भासत आहे. त्यामुळे विजेचे दर वाढणार आहेत. त्यातच एक महत्त्वाची ट्रान्समिशन लाइन याच काळात बंद पडली आहे. परिणामी वीज टंचाई व वीज दरवाढ हेही ग्राहकांना सहन करावे लागणार आहे.