मुंबईमध्ये भाजीपाल्यांची आवक वाढली असून, ६४२ ट्रक टेम्पोमधून सरासरी २ हजार टन भाजीपाला विक्रीसाठी येऊ लागला आहे़ कोबी, टोमॅटो, भोपळा, काकडी, भेंडी, सिमला मिरची, फूलकोबी यासह अनेक भाजीपाल्यांची आवक जास्त आहे़ यामुळे या आठवड्यामध्येही भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत
नाशिकमधून २ लाख ७० हजार कोथिंबीर जुड्या विक्रीसाठी आल्या आहेत़ मेथी, पालकाला ग्राहकांकडून मागणी आहेच; पण आरोग्याविषयी जागृती वाढल्यामुळे पुदिनाचा खपही वाढला आहे़ रोज सरासरी ७० हजार पुदिनाच्या जुड्यांची विक्री होत असून, होलसेल मार्केटमध्ये ३ ते ४ रुपयांना त्याची विक्री होत आहे़ उन्हाळा वाढल्यामुळे लिंबाचीही आवक वाढली़ लिंबू सरबताला मुंबईकरांची नेहमीच पसंती असते़ याशिवाय नागरिकांच्या रोजच्या आहारामध्येही लिंबूचा वापर वाढला असून, दररोज १७ टन लिंबूची आवक होत आहे़