मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 05:48 AM2024-11-20T05:48:00+5:302024-11-20T05:48:58+5:30

विधानसभेसाठी सर्वांना मतदान करता यावे, यासाठी अनेक खासगी आस्थापनांनीही सुट्टी जाहीर केली आहे.

Vegetables will reach Mumbaikars early in the morning on polling day; Grain, spice, fruit market will remain closed | मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद

मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील चार मार्केट बुधवारी विधानसभा निवडणुकीमुळे बंद राहणार आहेत. भाजीपाला मार्केट मध्यरात्रीपासून  सकाळी ७ पर्यंत सुरू राहणार आहे. मुंबई, नवी मुंबईकरांना भाजीपाला सुखरूप वितरित करून कामगार व व्यापारी मतदानासाठी जाणार आहेत. 

विधानसभेसाठी सर्वांना मतदान करता यावे, यासाठी अनेक खासगी आस्थापनांनीही सुट्टी जाहीर केली आहे. बाजार समितीमधील धान्य, मसाला, कांदा व फळ मार्केटमधील व्यापारीही व्यवसाय बंद ठेवणार आहे. 

भाजीपाला मार्केट रात्री २ नंतर सुरू होते व सकाळी ९ ते १०  वाजण्यापूर्वी सर्व व्यवहार बंद होत असतात. 

निवडणुकीमुळे पहाटे ७ पर्यंत सर्व व्यवहार पूर्ण करून मतदानासाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरवासीयांना सुरळीत भाजीपाला पोहोचणार असून, सर्वांना मतदानाचा हक्कही बजावता येणार आहे.

Web Title: Vegetables will reach Mumbaikars early in the morning on polling day; Grain, spice, fruit market will remain closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.