पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहने धावणार सुसाट; वाहतूककोंडी फोडण्यासाठी ‘ॲक्सेस कंट्रोल’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 09:40 AM2024-01-20T09:40:05+5:302024-01-20T09:41:27+5:30

वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई पालिकेने प्रवेश नियंत्रित मार्गाचा अर्थात एक्सेस कंट्रोल प्रकल्पाचा पर्याय निवडला आहे.

Vehicles will run smoothly on the east and west expressways in mumbai | पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहने धावणार सुसाट; वाहतूककोंडी फोडण्यासाठी ‘ॲक्सेस कंट्रोल’

पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहने धावणार सुसाट; वाहतूककोंडी फोडण्यासाठी ‘ॲक्सेस कंट्रोल’

मुंबई : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांची वाढलेली वर्दळ, त्यामुळे होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी मुंबई पालिकेने प्रवेश नियंत्रित मार्गाचा अर्थात एक्सेस कंट्रोल प्रकल्पाचा पर्याय निवडला आहे. वाहतूक सुसाट धावण्यासाठी होण्यासाठी या महामार्गावरील जंक्शनवर उड्डाणपूल, अंडरपास सुविधा उपलब्ध केले जाणार आहे. यासाठी पालिकेकडून पश्चिम उपनगरातील ३ तर पूर्व उपनगरात एका अशा ४ ठिकाणांची निवड केली आहे.

पूर्व द्रुतगती महामार्ग मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, चेंबूर, शीव, दादर, सीएसएमटीला जोडतो, तर पश्चिम द्रुतगती महामार्गावरील दहिसर, बोरीवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, वांद्रे इत्यादी उपनगरांना जोडतो. अत्यंत वर्दळीच्या या मार्गावर वाहतूककोंडी टाळण्यासाठी उड्डाणपूलही बांधले जाणार असल्याचे पालिकेने सांगितले.  

पश्चिम उपनगरात ही ठिकाणे :

 मिलन सब-वे जक्शन- अंडरपास आणि रस्ता रुंदीकरण
 सुधीर फडके उड्डाणपूल- अंडरपास आणि रस्ता रुंदीकरण
विलेपार्ले हनुमान रोड- अंडरपास आणि रस्ता रुंदीकरण
पूर्व उपनगरात ही ठिकाणे 
बीकेसी कनेक्टर- यूटर्न उड्डाणपूल

पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी आणखी उड्डाणपुलांची गरज, विनासिग्नल वाहतूक सुरळीत राहणे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.  मुंबईकरांची वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी हा प्रयत्न असणार आहे. - पी वेलारासू, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प), मुंबई पालिका

ॲक्सेस कंट्रोल प्रणाली :

पूर्व व पश्चिम या दोन्ही महामार्गांवरील नऊ जंक्शनचा अभ्यास पालिका प्रशासनाने केला आहे. या प्रकल्पाचे विस्तारीकरण त्याच रस्त्यांवर शक्य आहे. जिथे रुंदीकरण आणि विस्तारीकरणासाठी पुरेशी जागा आहे, त्यामुळे अखेर प्रस्तावित ९ पैकी ४ ठिकाणांवर ॲक्सेस कंट्राेल प्रणाली असेल. 

वाहतूक हाेणार सुरळीत :

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवरून वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. ज्या पट्ट्यात वाहतूककोंडी होते, तेथील उड्डाणपूल, अंडरपास सुविधा उपलब्ध करून वाहतूक सुरळीत हाेणार आहे.

Web Title: Vehicles will run smoothly on the east and west expressways in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.