'ते व्हेंटीलेटर देवेंद्र फडणवीस अन् चंद्रकांत पाटलांनी सुरू करून दाखवावेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 04:19 PM2021-05-18T16:19:30+5:302021-05-18T16:19:50+5:30

फडणवीस म्हणाले की, पंतप्रधानांनी महाराष्ट्राला भरपूर मदत केली. व्हेंटिलेटर दिले, रेमडेसिविर दिले परंतु या सरकारने व्हेंटिलेटर उघडूनच बघितले नाहीत.

'Ventilator provided by PM Care Fund should be started by Fadnavis and Chandrakant Patil', sachin sawant | 'ते व्हेंटीलेटर देवेंद्र फडणवीस अन् चंद्रकांत पाटलांनी सुरू करून दाखवावेत'

'ते व्हेंटीलेटर देवेंद्र फडणवीस अन् चंद्रकांत पाटलांनी सुरू करून दाखवावेत'

googlenewsNext
ठळक मुद्देफडणवीस यांच्या या आरोपाला उत्तर देताना काँग्रेसे नेते सचिन सावंत यांनी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना चॅलेंज दिले आहे. 'PMCares फंडातून महाराष्ट्राला केंद्र सरकारने दिलेले ज्योती सीएनसी कंपनीचे व्हेंटिलेटर पूर्णतः तकलादू असल्याचे अहवाल सांगतो

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला भरघोस मदत केली, व्हेंटिलेटर दिले, रेमडेसिविर दिले, ऑक्सिजन दिला, मात्र आघाडीचे नेते त्याचा उपयोग करण्याऐवजी कांगावा करत आहेत, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली होती. केंद्राने पाठविलेले व्हेंटीलेटर राज्य सरकारने उघडूनही बघितले नसल्याचा दावाही फडणवीस यांनी केला होता. त्यावरुन, काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावलाय. 

मोदींना मी महाराष्ट्राची परिस्थिती सांगत असतो, मदतही मागत असतो. त्यामुळे मी त्यांना पत्र लिहावे, असा सल्ला देणाऱ्या कांगावेखोरांना मी उत्तर देत नाही, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर पलटवार केला होता. अकोल्यातील कोविड रूग्णांची स्थिती व उपाययोजना याबाबत आढावा घेण्यासाठी फडणवीस रविवारी अकोल्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

फडणवीस म्हणाले की, पंतप्रधानांनी महाराष्ट्राला भरपूर मदत केली. व्हेंटिलेटर दिले, रेमडेसिविर दिले परंतु या सरकारने व्हेंटिलेटर उघडूनच बघितले नाहीत. त्यामुळे अनेक व्हेंटिलेटरमध्ये त्रुटी राहिल्या. ही मशीन आहे चार-चार महिने पडून राहत असेल तर यामध्ये काही दोष येऊ शकतात. त्या मशीन पडून राहिल्या याला जबाबदार कोण? राज्य शासनाकडे कुशल मनुष्यबळ नाही, त्यामुळे हे व्हेंटिलेटर पडून खराब झाले असतील तर त्याचा दोष केंद्रावर ढकलून ऑडिट करण्याची राज्य शासनाची भूमिका हा कांगावा आहे, असा आरोपही फडणवीस यांनी केला.  


फडणवीस यांच्या या आरोपाला उत्तर देताना काँग्रेसे नेते सचिन सावंत यांनी फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना चॅलेंज दिले आहे. 'PMCares फंडातून महाराष्ट्राला केंद्र सरकारने दिलेले ज्योती सीएनसी कंपनीचे व्हेंटिलेटर पूर्णतः तकलादू असल्याचे अहवाल सांगतो. मोदींची प्रतिमा जनतेच्या जीवापेक्षा महत्वाची मानणाऱ्या फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी हे तकलादू व्हेंटिलेटर चालू करुन दाखवावे, असे आमचे आव्हान आहे, असे सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. तसेच, व्हिडिओही शेअर केलाय.

Web Title: 'Ventilator provided by PM Care Fund should be started by Fadnavis and Chandrakant Patil', sachin sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.