मुंबईतील वेरावली जलाशयाच्या जलवाहिनीचे काम अखेर पूर्ण
By सीमा महांगडे | Published: December 4, 2023 02:45 PM2023-12-04T14:45:13+5:302023-12-04T14:45:44+5:30
नादुरुस्त जलवाहिनी ही खूप खोल असून त्याला एकापेक्षा जास्त ठिकाणी हानी पोहोचली आहे
अंधेरीतील वेरावली सेवा जलाशयाच्या १८०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती ही वेगवेगळ्या आव्हानांवर मात करुन, सुमारे ५० तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पूर्ण झाली आहे. आता या जलवाहिनीमध्ये पाणी सोडून सेवा जलाशय भरण्यात येतील. त्यानंतर सर्व संबंधित परिसरांमध्ये टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी माहिती पलिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कामाला उशीर का झाला?
नादुरुस्त जलवाहिनी ही खूप खोल असून त्याला एकापेक्षा जास्त ठिकाणी हानी पोहोचली आहे. जलवाहिनीमधील पाण्याच्या दाबामुळे पूर्णपणे जलवाहिनी रिकामी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करावा लागला आहे. जलवाहिनीजवळ असणाऱ्या मातीमुळे काम करताना अडथळे निर्माण होत होते. या सर्व तांत्रिक आणि नैसर्गिक कारणांमुळे दुरुस्तीचे काम नियोजित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही.