वेळुकरांना कामावर न जाण्याचे आदेश

By admin | Published: February 20, 2015 01:32 AM2015-02-20T01:32:49+5:302015-02-20T01:32:49+5:30

राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.राजन वेळूकर यांना त्यांच्या दैनदिन प्रशासकिय कामकाजावर न जाण्याचे आदेश दिले आहेत.

The verdict does not go to work | वेळुकरांना कामावर न जाण्याचे आदेश

वेळुकरांना कामावर न जाण्याचे आदेश

Next

मुंबई : राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.राजन वेळूकर यांना त्यांच्या दैनदिन प्रशासकिय कामकाजावर न जाण्याचे आदेश दिले आहेत.
उच्च न्यायालयाने वेळूकर यांच्या पात्रतेविषयीच्या जनहित याचिकेवर आदेश निर्गमित केले. या आदेशात राज्यपालांनी शोध समितीला पुनर्विचार करुन वेळूकरांच्या पात्रतेविषयीचा अहवाल चार आठवड्याच्या आत न्यायालयासमोर सादर करावा असे आदेशात म्हटले आहे.
या समितीचे कामकाज पारदर्शक आणि निपक्षपातीपणे व्हावे यासाठी कदाचित कुलगुरुना कार्यालयीन कामकाजापासून दुर राहण्याचे आदेश दिले असावेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.नरेश चंद्र यांना प्रभारी कुलगुरु पदाचा भार स्विकारावा असे आदेश गुरुवारी दिल्याचे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम.ए.खान यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी २0१0 मध्ये डॉ. वेळुकर नियुक्ती करण्यात आली होती. गुरुवारी त्यांची उचलबांगडी करण्यात आली.

अमरावती विद्यापीठ
मुलीचे गुणवाढ प्रकरण आणि विद्यापीठातील आर्थिक अनियमितता या प्रकरणामुळे अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मोहन खेडकर यांना तात्कालीन कुलपती के. शंकरनारायणन यांनी सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. डिसेंबर २0१३ मध्ये त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. अद्याप खेडकर सक्तीच्या रजेवर आहेत.

नागपूर विद्यापीठ
सिनेट सदस्यांनी अर्थसंकल्प मंजूर करण्यास कुलगुरु डॉ. विलास सकपाळ यांना विरोध केला. राज्यपालांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले होते. यामुळे २0१४ मध्ये सकपाळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

च्मुलीचे गुण वाढविल्याप्रकरणी राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना १९८६ मध्ये राजीनामा द्यावा लागला होता.
च्या प्रकरणाची नौतिक जबाबदारी स्विकारुन विद्यापीठाचे तात्कालीन कुलगुरु राम जोशी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ केला होता.

Web Title: The verdict does not go to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.