त्या विकृता विरोधात दोन दिवसांत निकाल; ५०० सीसीटीव्ही अन् १०० दिवसांच्या तपासानंतर केली होती अटक

By मनीषा म्हात्रे | Published: October 11, 2022 10:14 PM2022-10-11T22:14:05+5:302022-10-11T22:18:09+5:30

अवघ्या दोन दिवसांत आरोपीला दोषी सिद्ध करत ६ महिने साधी कैद आणि ५०० ​​रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

Verdict within two days against that malpractice; The arrest was made after 500 CCTVs and 100 days of investigation | त्या विकृता विरोधात दोन दिवसांत निकाल; ५०० सीसीटीव्ही अन् १०० दिवसांच्या तपासानंतर केली होती अटक

त्या विकृता विरोधात दोन दिवसांत निकाल; ५०० सीसीटीव्ही अन् १०० दिवसांच्या तपासानंतर केली होती अटक

Next

मुंबई : कॉलेज विद्यार्थिनीला पाहून अश्लील चाळे करणाऱ्या विकृताला अखेर चार महिन्यांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपीच्या शोधासाठी गेल्या १०० दिवसांत ५०० सीसीटीव्ही तपासले. अखेर, दिवस रात्र केलेल्या मेहनतीला यश आले. राम लखन कन्हैयालाल (३२) असे आरोपीचे नाव असून तो उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोप पत्र दाखल केले. आणि अवघ्या दोन दिवसांत आरोपीला दोषी सिद्ध करत ६ महिने साधी कैद आणि ५०० ​​रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास केनडी ब्रिज जवळून पाळीव श्वानाला घेऊन जात असताना एकाने तिच्याकडे पाहून अश्लील कृत्य केले. या प्रकाराने ती घाबरली. तेथून गावदेवी पोलीस ठाणे गाठून तिने तक्रार दिली. गावदेवी पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. पोलीस उपायुक्त नीलोत्पल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम गिरप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी श्रीनिवास दराडे, संदीप माने, अंमलदार नरेंद्र कांबळे, विवेक तोडणकर, कदम, अवधूत राणे यांनी तपास सुरु केला. परिसरातील जवळपास ५०० सीसीटीव्ही तपासले. यादरम्यान आरोपीच्या मिळालेल्या फुटेजवरून आरोपीचा शोध सुरु केला. तो उत्तरप्रदेशचा रहिवासी असून बिगारी काम करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. गेल्या १०० दिवसापासून पथक दिवसरात्र त्याच्या मागावर होते. अखेर तो उत्तरप्रदेशवरून मुंबईत आल्याची माहिती मिळताच पथकाने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. चौकशीत तो पेंटर म्हणून काम करत असून उत्तरप्रदेशचा रहिवासी असून मुंबईच्या फुटपाथवर राहतो. घटनेनंतर तो गावी पळून गेला होता. तसेच नशेत त्याने कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

सदर प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता गावदेवी पोलीस ठाणेकडुन, मा. ४० व्या महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर ७ ऑक्टोबर रोजी २४ तासांच्या आत आरोपपत्र दाखल केले होते.मा. न्यायालयाने देखील हे प्रकरण तातडीने ​​सुनावणीसाठी आणले आणि २ दिवसांच्या खटल्यात, पीडितेच्या उत्कृष्ट साक्ष, ६५ बी प्रमाणपत्रांसह सीसीटीव्ही फुटेज, पंच आणि तपासी अधिकारी यांची तपासणी, या बाबी नंतर   आरोपीला ६ महिने साधी कैद आणि ५०० ​​रुपये दंड ठोठावला आहे.

Web Title: Verdict within two days against that malpractice; The arrest was made after 500 CCTVs and 100 days of investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.