मुंबई : महावितरणच्या विद्युत सहायक पदाच्या प्रतीक्षा यादीवरील ३ हजार ३४ उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी, येत्या २ व ३ मे रोजी संबंधित परिमंडल स्तरावर करण्यात येणार आहे. २ मे रोजी खुल्या प्रवर्गातील तर ३ मे रोजी राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. महावितरणतर्फे विद्युत सहायक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीवर असलेल्या ३ हजार ३४ उमेदवारांची नियुक्ती विद्युत सहायक म्हणून करण्यात येत असून, या विद्युत सहायकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडल पातळीवर २ व ३ मे रोजी करण्यात येईल. प्रतीक्षा यादीतील ३ हजार ३४ उमेदवारांना त्यांच्या प्रमाणपत्राच्या छाननीनंतर विद्युत सहायक या पदाचे नियुक्तीपत्र संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यामार्फत देण्यात येणार आहे, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
विद्युत सहायकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी
By admin | Published: May 01, 2017 4:26 AM