Join us

३६ हजार ४५२ ग्राहकांच्या मीटरची पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महावितरणच्या भांडूप परिमंडलात तात्पुरता वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या मीटरची तपासणी तसेच वीजबिल वसुलीची मोहीम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महावितरणच्या भांडूप परिमंडलात तात्पुरता वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या मीटरची तपासणी तसेच वीजबिल वसुलीची मोहीम वेगात सुरु आहे. याशिवाय, ३० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांच्या मीटरचीही तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये गेल्या तीन महिन्यात भांडूप परिमंडलात ३६ हजार ४५२ ग्राहकांच्या मीटरची पडताळणी करण्यात आली आहे.

महावितरण मुख्य कार्यालयाच्या आदेशाप्रमाणे, सर्व परिमंडलात स्थानिक पातळीवर वीजबिलाच्या थकबाकीची वसुली, तसेच अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्या वीजचोरांवर कारवाईची मोहीम सुरु आहे. याचाच भाग म्हणून ३० युनिटपर्यंत वीजवापर असणाऱ्या ग्राहकांचे वीज मीटर तपासण्यात येत आहेत. वीजबिल वसुली, वीज बिलाची थकबाकी न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे तसेच शून्य अथवा १-३० युनिटपर्यंत वीजवापर असणाऱ्या ग्राहकांचे वीज मीटर तपासण्यात येत आहेत. भांडूप परिमंडलात सर्व विभाग मिळून एकूण तीन लाख ३० हजार २२२ ग्राहक शून्य अथवा १-३० युनिटपर्यंत वीजवापर करीत आहेत. यामध्ये, भांडूप परिमंडलात ३६ हजार ४५२ ग्राहकांचे मीटर तपासण्यात आले. यात अनेक ठिकाणी मीटरची सील तुटणे, टर्मिनलचा कवर नसणे, मीटर घराच्या आत असणे व इतर कारणांमुळे वीज वापर कमी असल्याचे आढळून आले आहे.

चौकट

१२७ प्रकरणांत कारवाई

ग्राहकांचे मीटर तपासणी कारवाई तीव्र केली असून, ग्राहकांनी अधिकृतपणे विजेचा वापर करावा तसेच वापरलेल्या विजेचे देयक प्रामाणिकपणे वेळेत भरावे. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी अनधिकृत विजेचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. १२७ प्रकरणांत कारवाई करण्यात येत आहे. यापुढे ही मोहीम तीव्र होणार असून, ग्राहकांनी अनधिकृतपणे विजेचा वापर करू नये. ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित केला आहे, अशा ग्राहकांनी सोयीप्रमाणे वीजबिल भरणा केंद्रावर जाऊन अथवा ॲप किंवा संकेतस्थळावर जाऊन वीजबिल भरावे, असे आवाहन भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे.