प्रतिक्षा यादीतील विद्युत सहाय्यकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी आजही होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 07:08 PM2022-11-02T19:08:54+5:302022-11-02T19:09:16+5:30

उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्णयानुसार प्रसिध्द केलेल्या सुधारित निवड यादीमध्ये नव्याने निवड झालेल्या  विद्युत सहाय्यक या संवर्गाच्या प्रतिक्षा यादीतील  उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची  परिमंडलनिहाय पडताळणी ३ नोव्हेंबर रोजी देखील करण्यात येणार आहे.

Verification of certificates of electrical assistants in the waiting list will continue today | प्रतिक्षा यादीतील विद्युत सहाय्यकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी आजही होणार

प्रतिक्षा यादीतील विद्युत सहाय्यकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी आजही होणार

googlenewsNext

मुंबई :

उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्णयानुसार प्रसिध्द केलेल्या सुधारित निवड यादीमध्ये नव्याने निवड झालेल्या  विद्युत सहाय्यक या संवर्गाच्या प्रतिक्षा यादीतील  उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची  परिमंडलनिहाय पडताळणी ३ नोव्हेंबर रोजी देखील करण्यात येणार आहे.

महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्तपदे भरण्याकरिता उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची परिमंडलनिहाय पडताळणी  मागील चार दिवसांपासून करण्यात येत आहे. यामध्ये प्रतिक्षा यादीतील काही उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. 

परिमंडलनिहाय प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडल कार्यालयांमध्ये ३ नोव्हेंबर रोजी आपल्या कागदपत्रांची पडताळणी स्वतः उपस्थित राहून करणे अनिवार्य आहे.  प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची परिमंडलनिहाय यादी महावितरणच्या संकेतस्थळवर (www.mahadiscom.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरिता हजर राहणार नाहीत,  अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल.

Web Title: Verification of certificates of electrical assistants in the waiting list will continue today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.