Join us

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेच्या वेळेत पुन्हा बदल, पहिली मेट्रो सकाळी ५.३० वाजता सुटणार

By सचिन लुंगसे | Published: November 28, 2022 10:52 AM

८ जून २०१४ पासून आतापर्यंत म्हणजे ८ वर्षे ५ महिन्यात मेट्रोने ७६ कोटींपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केली आहे.

मुंबई- वर्सोवा - अंधेरी - घाटकोपर या मेट्रो मार्गावर धावणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या वेळेत आता सोमवारपासून पुन्हा एकदा बदल करण्यात आले आहेत. नव्या वेळापत्रवर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो रेल्वेच्या वेळेत पुन्हा बदल, पहिली मेट्रो सकाळी ५.३० वाजता सुटणारकानुसार  पहिली मेट्रो सकाळी ५.३० वाजता घाटकोपर आणि वर्सोवा या स्थानकांवरून सुटणार आहे. तर वर्सोवा येथून शेवटची मेट्रो रात्री ११.२० आणि घाटकोपर येथून शेवटची मेट्रो रात्री ११.४५ वाजता सुटणार आहे. बदलत्या वेळेमुळे प्रवाशांना सकाळी लवकर आणि रात्री उशिरापर्यंत मेट्रोमधून प्रवास करता येणार आहे.

अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल बंद झाल्यापासून मुंबईकरांची दमछाक झाली असून, प्रवाशांना वेळेचा नाहक भुर्दंड बसू लागला आहे. प्रवाशांचा वेळ वाचावा म्हणून वाहतूक विभागाने पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले असले तरीदेखील वेळ वाचावा म्हणून प्रवासी मेट्रोचा आधार घेत आहेत. त्यामुळे वर्सोवा - अंधेरी - घाटकोपर या मेट्रो मार्गावरून धावणा-या मेट्रो प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे.

- पहिल्या मेट्रोचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले.- १० जुलै २०१५ रोजी म्हणजेच ३९८ दिवसांच्या ऑपरेशननंतर १ दशलक्ष प्रवाशांचा पहिला टप्पा गाठला.- २०१९ मध्ये मेट्रो वनने २६४ दिवसांत १ दशलक्ष प्रवासी जोडून विक्रम केला.- कोविडचा प्रभाव असूनही आणि २११ दिवस अकार्यक्षम राहूनही २० ऑक्टोबर २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत १ दशलक्ष प्रवासी जोडले.

७६ कोटी प्रवासी -८ जून २०१४ पासून आतापर्यंत म्हणजे ८ वर्षे ५ महिन्यात मेट्रोने ७६ कोटींपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केली आहे.

टॅग्स :मेट्रोमुंबई