वर्सोव्यात अँड. आशिष शेलार यांनी केली महाआरती; प्रति अयोध्या बघण्यासाठी भाविकांनी केली गर्दी

By मनोहर कुंभेजकर | Published: January 22, 2024 04:57 PM2024-01-22T16:57:15+5:302024-01-22T16:57:57+5:30

सकाळ पासूनच वर्सोव्यातील विविध जाती धर्माच्या नागरिकांनी येथे गर्दी केली होती.

Versova Ashish Shelar performed Mahaarti; Devotees thronged to see Ayodhya | वर्सोव्यात अँड. आशिष शेलार यांनी केली महाआरती; प्रति अयोध्या बघण्यासाठी भाविकांनी केली गर्दी

वर्सोव्यात अँड. आशिष शेलार यांनी केली महाआरती; प्रति अयोध्या बघण्यासाठी भाविकांनी केली गर्दी

मुंबई - श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्त वर्सोवा विधानसभेच्या भाजप आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी श्रीराम मंदिराच्या भव्य प्रतिकृती दर्शन सोहळा येथे आयोजित केला. या कार्यक्रमस्थळी मुंबई भाजप अध्यक्ष ,आमदार अँड.आशिष शेलार यांनी आज सकाळी भेट देऊन महाआरती केली आणि रामनामाचा जयघोष केला. 

आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी आज वर्सोवा, एस व्ही रोड, जोगेश्वरी पश्चिम येथील दिल्ली दरबार हॉटेल समोरील मैदानात प्रभू श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन केले असून वर्सोव्यात प्रति आयोध्या
उभारली आहे. सकाळ पासूनच वर्सोव्यातील विविध जाती धर्माच्या नागरिकांनी येथे गर्दी केली होती.

आमदार अँड.आशिष शेलार म्हणाले की,येथे सुंदरकांडाचे आणि रामनामाचे पठण करण्यात आले. तसेच महापूजन आणि होम हवन तसेच महाआरती, महाभंडारा आणि भजन संध्येचेही आयोजन करण्यात आले.तसेच वर्सोव्यात अयोध्येच्या श्री राम मंदिराची भव्य प्रतिकृती साकरल्याबद्धल आणि येथील वातावरण राममय केल्या बद्धल शेलार यांनी आमदार लव्हेकर यांचे कौतुक केले.

यावेळी आमदार डॉ. भारती लव्हेकर म्हणाल्या की, ज्या राम भक्तांना हा सोहळा अनुभवायचा आहे,मात्र तिथपर्यंत पोहचता येणार नाही, अशा वर्सोवाकरांसाठी आम्ही येथे अयोध्येच्या राम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आणि प्रभू श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण येथील राम भक्तांना दाखवले.तर सकाळी अंध नागरिकांनी सुमारे दीड तास  भजन साकारून श्रीरामाचा येथे जयघोष केला.
 

Web Title: Versova Ashish Shelar performed Mahaarti; Devotees thronged to see Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.