आधुनिक यंत्रसामुग्रीने वर्सोवा बीच क्लिनिंगला दिमाखात सुरवात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 11:41 AM2018-08-05T11:41:08+5:302018-08-05T11:50:25+5:30

Versova Beach cleaning Started With Modern Machinery | आधुनिक यंत्रसामुग्रीने वर्सोवा बीच क्लिनिंगला दिमाखात सुरवात

आधुनिक यंत्रसामुग्रीने वर्सोवा बीच क्लिनिंगला दिमाखात सुरवात

Next

- मनोहर कुंभेजकर
मुंबई- वर्सोवा बीच हा आता चकाचक व कचरामुक्त होणार असून आधुनिक यंत्रसामुग्रीने वर्सोवा बीच क्लिनिगला नुकतीच दिमाखात सुरवात झाली.काल एक दिवसात आधुनिक यंत्र सामुग्री व दोन शिफ्ट मध्ये 100 मुजुरांनी येथील बीच वरील गेल्या दोन दिवसात सुमारे 35 मेट्रिक टन कचरा उचलून तो डंपिंग ग्राऊंड वर पाठवण्यात आला.यामध्ये प्लास्टिक देखिल मोठ्या प्रमाणात होते.
मुंबई महानगर पालिकेच्या नवीन बीच क्लिनिग पॉलिसी प्रमाणे वर्सोवा बीच क्लिनिगच्या कामाचा नुकताच दणक्यात शुभारंभ  वर्सोवा विधानसभेच्या आमदार डॉ.भारती लव्हेकर यांच्या हस्ते नुकतेच वर्सोवा येथील देवाची वाडी येथे करण्यात आला.यावेळी वर्सोवा बीच क्लिनिगचे जनक अँड.अफरोझ शाह,के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष योगिराज दाभाडकर,प्रभाग क्रमांक 63 च्या भाजपा नगरसेविका रंजना पाटील,पंकज भावे,प्रवीण भावे,दर्शन लाकडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
      वर्सोवा बीच क्लिनिगचे जनक अफरोझ शाह यांनी 15 ऑक्टोबर 2015 साली वर्सोवा बीच क्लिनिगला सुरवात केली होती.गेली 145 आठवडे दर शनिवारी आणि रविवारी त्याच्या या स्वच्छता मोहिमेला जागतिक स्तरावर चांगला प्रतिसाद मिळाला आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "मन की बात "मध्ये त्याच्या या कार्याचा गौरव केला होता, तर सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी बीच अफरोझ ला बीच क्लिनिग साठी सुमारे 70 लाखांची मशिनरी दिली होती.
  येथील एक आमदार व सामाजिक बांधिलकी यानात्याने  सुरवातीपासूनच त्याच्या या मोहिमेला आपण मोलाचे सहकार्य केल्याची माहिती आमदार डॉ.लव्हेकर यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखिल त्याच्या मोहिमेचे कौतुक करून खास वर्सोवा बीच वर  येऊन त्यांनी अफरोझच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता अशी माहिती त्यांनी  दिली.
आपल्या वर्सोवा मतदार संघात सागर कुटीर ते थेट वर्सोवा जेट्टी पर्यंत 3.5 किमीचा हा बीच चकाचक, कचरा व प्लास्टिकमुक्त राहण्यासाठी आपण व अफरोझ शाह यांनी खास बीच क्लिनिगची नवीन पॉलिसी करण्यास पालिकेला भाग पाडले.त्यामुळे खऱ्या अर्थाने येथे आधुनिक पध्दतीने बीच क्लिनिग च्या कामाला दणक्यात सुरवात झाल्याची माहिती आमदार लव्हेकर यांनी लोकमताशी बोलतांना दिली.
मुंबई महानगर पालिका प्रशासन , अंधेरी पश्चिन विधानसभेचे भाजपा आमदार अमित साटम, वर्सोवा विधानसभेच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर आदी लोकप्रतिनिधी व बीच क्लिनिंगचे जनक अँड.अफरोझ शाह यांनी एकत्रितपणे येऊन समुद्रातील जमा होणाऱ्या कचऱ्यावर मात करण्यासाठी आणि रोज जमा होणारा कचरा उचलण्यासाठी कोणती आधुनिक मशिनरी पाहिजे,किती कामगार यासाठी लागतील याचा गांभिर्याने अभ्यास करून यंदाच्या पावसाळ्यापासून वर्सोवासाठी नवीन बीच क्लिनिंग पॉलिसी मुंबई महानगर पालिकेने प्रथमच तयार केली आहे.
मुंबई महानगर पालिकेने मोरा गाव नाला ते सगरकुटीर हा सुमारे 1 किमीचा अंधेरी पश्चिम विधानसभेत येणारा बीच आणि सागर कुटीर ते वर्सोवा जेट्टी हा वर्सोचा विधानसभेत येणाऱ्या सुमारे 3.5 किमी बीच असा एकत्रित सुमारे 4.5 किमी च्या बीच क्लिनिगसाठी स्पेक्ट्रॉन इंजिनियरिंग या कंपनीला 6 वर्षीसाठी सुमारे 23 कोटींचे कंत्राट दिले आहे.सकाळी 6 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते रात्री 10 या दोन शिफ्ट मध्ये पावसाळ्यात 100 कामगार आणि पावसाळ्यानंतर रोज 50 कामगार पालिकेच्या नव्या बीच क्लिनिग पॉलिसी प्रमाणे वर्सोवा बीच चकाचक करतील अशी माहिती के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्ष योगिराज दाभाडकर यांनी दिली.

Web Title: Versova Beach cleaning Started With Modern Machinery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.