मुंबई : प्रवाशांना निसर्गसौंदर्याचा अनुभव देत, चमचमीत खाद्यपदार्थ देण्यासाठी मध्य रेल्वे आणि आयआरसीटीसीने जय्यत तयारी केली आहे. पर्यटनपूरक पारदर्शी बोगी अशी ओळख असलेल्या विस्टाडोममधील प्रवाशांना, अवघ्या ४० रुपयांत केशरी हलवा देण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे. त्याचबरोबर, व्हेज बिर्यानी, मसाला उपमा, लेमन राइस, राजमा मसाला आणि जिरा राइस असे ‘मेन्यू’देखील प्रवाशांसमोर मांडण्यात येणार आहेत.विस्टाडोम बोगी दादर-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेसला जोडण्यात येणार आहे. या बोगीमध्ये प्रवासादरम्यान निसर्गाचा आनंद घेता यावा, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.सेल्फी ‘पॉइंट’ नव्हे ‘स्पेस’प्रवासातील आठवणी कॅमे-यात कैद करण्याची आवड बहुतांशी प्रवाशांना असते. प्रवाशांची हीच आवड लक्षात घेत, विस्टाडोममध्ये सेल्फी ‘स्पेस’ची निर्मिती करण्यात आली आहे. घाट परिसराचा आनंद घेण्यासाठी विस्तृत आकाराच्या खिडक्या मुख्यत्वे करून निरीक्षण करण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, याचा वापर प्रवासी सेल्फी स्पेस म्हणून करण्याची शक्यता रेल्वे अधिकाºयांनी वर्तविली आहे.
पर्यटनपूरक पारदर्शी बोगी अशी ओळख असलेल्या विस्टाडोममध्ये ‘केशरी हलवा’ केवळ ४० रुपयांमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 6:30 AM