मराठी सिनेसृष्टीला धक्का; ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 09:58 PM2020-07-02T21:58:22+5:302020-07-02T22:37:17+5:30
हिमालयाची सावली’, ‘कस्तुरी मृग’, ‘राम तुझी सीता माऊली’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘आमच्या या घरात’, ‘शॉर्टकट’, ‘दुभंग’ अशा सुमारे ३० हून अधिक नाटकांत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या.
मुंबई : मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचे ठाण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते गेले 2 वर्ष कॅन्सरशी झुंज देत होते. अखेर गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, 3 मुली, नातवंडं असा परिवार आहे.
हिमालयाची सावली’, ‘कस्तुरी मृग’, ‘राम तुझी सीता माऊली’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘आमच्या या घरात’, ‘शॉर्टकट’, ‘दुभंग’ अशा सुमारे ३० हून अधिक नाटकांत त्यांनी वेगवेगळ्या भूमिका केल्या. ‘वात्रट मेले’ नाटकातील ‘पेडणेकर मामा’, ‘केला तुका नी झाला माका’मधील ‘आप्पा मास्तर’, ‘वस्त्रहरण’ नाटकातील ‘जोशी मास्तर’ अशा त्यांच्या काही गाजलेल्या भूमिका. कांबळी यांच्या अभिनय कारकिर्दीतील ‘फनी थिग कॉल्ड लव्ह’ हे एक महत्त्वाचे नाटक. या नाटकाने त्यांना अमराठी प्रेक्षकही ओळखायला लागले. कारण हे नाटक इंग्रजी होते. यात त्यांची ‘डिकास्टा’ ही गॅरेज मालकाची भूमिका होती. या नाटकाचे दोनशे प्रयोग त्यांनी केले. मच्छिंद्र कांबळी यांच्याही बरोबर अनेक नाटकांमधून त्यांनी कामे केली.
‘वस्त्रहरण’, ‘हसवाफसवी’या नाटकाने त्यांना परदेशात जाण्याची संधी मिळाली. ‘भाकरी आणि फूल’, ‘गोटय़ा’, ‘बे दुणे तीन’, ‘कथास्तु’, ‘हसवणूक’, ‘कॉमेडी डॉट कॉम’, ‘चला बनू या रोडपती’, ‘गंगुबाई नॉन मॅट्रिक’ या दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधूनही त्यांनी काम केले. ‘बे दुणे तीन’ ही मालिका खूप लोकप्रिय ठरली आणि या मालिकेमुळे कांबळी यांना ओळख मिळाली. डॉ. श्रीराम लागू यांच्यासह सतीश दुभाषी, भक्ती बर्वे, प्रशांत दामले, रोहिणी हट्टंगडी, मच्छिंद्र कांबळी, भारती आचरेकर, सखाराम भावे, राजा मयेकर, सुकन्या कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर आणि अनेक दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी काम केले.
व्यावयिक रंगभूमीवर १०० हून अधिक प्रयोग केलेली नाटकं
काचेचा चंद्र, हिमालयाची सावली, कस्तुरी मृग, दुभंग, राम तुझी सीता माऊली, वात्रट मेले, केला तुका नि झाला माका, अखेर तू येशीलच, लेकुरे उदंड जहाली, बे दुणे पाच, चाकरमानी, हसवाफसवी, फनी थिंग कॉल्ड लव्ह, वस्त्रहरण, शॉर्टकट, प्रीतीगंध, प्रेमा तुझा रंग कसा, एक दिवस येईलच, वन रूम किचन, सासू पाहून लग्न करा, आमच्या या घरात, चला घेतला खांद्यावर
उल्लेखनीय नाटकं
जिथे फूल उमलते, कथा नव्या संसाराची, नयन तुझे जादूगार, सगळे मेले सारखेच, विमानहरण, चला घेतला खांद्यावर, शहाण्यांनी खावं बसून, अशी ही फसवाफसवी, लफडं सोवळ्यातलं, चंपू खानावळीण (मालवणी)
दिग्दर्शित केलेली नाटकं
केला तुका नि झाला माका, वात्रट मेले, चाळगती, मालवणी सौभद्र, तुझ्यात नि माझ्यात, सगळे मेले सारखेच
स्पर्धासाठी लिहिलेल्या एकांकिका
चौकट, असं घडलं रामायण, कांचनमृग, बुडबुडे, तितू, चौथा अंक
दूरदर्शनसाठी केलेली नाटकं
सभ्य गृहस्थ हो, हसत हसत फसवूनी, रमल रफू, शिकार
दूरदर्शन मालिका
भाकरी आणि फूल, गोटया, बे दुणे तीन, पाऊस मृगाचा पडतो, कथास्तु, पोलिसातला माणूस, गिनीपिग, हसवणूक, सोनबाची शिदोरी, मेवालाल (हिंदी), नन्हे जासूस (हिंदी),महाबली,कॅलिडोस्कोप, मिसळ, हाऊस-मौज, कॉमेडी डॉट कॉम, थोरला हो, सांजभूल, दिशा, चला बनू या रोडपती, ही चाळ कुरूकुरू, एक वाडा झपाटलेला, गंगुबाई नॉन मॅट्रिक, भाग्यविधाता, गुण्यागोविंदाने, एक झोका नियतीचा टेलिफिल्म्स गणूराया, काज, कॅप्टन परत आलाय, धर्मा रामजोशी
चित्रपट
सिंहासन, हल्लागुल्ला, रंगत संगत, आई पाहिजे, सारेच सज्जन, जिगर, बरखा सातारकर, प्राण जाये पर शान न जाय, श्वास, बीज (हिंदी), सविता बानो, हंगामा, वन रूम किचन, सुकन्या
आणखी बातम्या...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटीतून प्रवास मोफत सुरू राहणार, दुसऱ्यांदा परिपत्रक रद्द
जव्हारच्या काळमांडवी धबधब्यात 5 मुलं बुडाली
टिकटॉक बंदीवरून TMC खासदार नुसरत जहाँ यांचा मोदी सरकारला सवाल, म्हणाल्या...
'या' राज्यात 1088 अत्याधुनिक रुग्णवाहिका सुरू; अवघ्या काही मिनिटांत लोकांपर्यंत पोहोचतील
TikTok सारखं भारतीय Moj अॅप; अवघ्या दोन दिवसांत हजारो युजर्स
भारतालाही 'डिजिटल स्ट्राइक' करणे माहीत आहे - रविशंकर प्रसाद