ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 09:02 AM2018-11-09T09:02:45+5:302018-11-09T09:28:14+5:30

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे वृद्धापकाळानं निधन झाले आहे. 

Veteran actress Lalan Sarang passed away | ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं निधन

Next

पुणे - प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्मात्या लालन सारंग यांचे वृद्धापकाळात निधन झालं आहे. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. सामना, हा खेळ सावल्यांचा, महेक अशा सिनेमांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. सखाराम बाईंडर, रथचक्र, कमला या नाटकांतमध्येही त्यांनी साकारलेल्या भूमिका खास होत्या. या तिन्ही नाटकांतील त्यांच्या भूमिका कलावंत म्हणून त्यांचा कस पाहणाऱ्या होत्याच शिवाय जगण्याचं भान देणाऱ्या होत्या, असं लालन सारंग यांनी म्हटलं होतं.

यासोबतच त्यांनी स्टील फ्रेम आणि अशा या दोघी नाटकातही काम केलं. त्यांनी नाटकामागील नाट्य हे पुस्तकही लिहिलं होतं. प्रसिद्ध निर्माते कमलाकर सारंग हे त्यांचे पती तर तनुश्री-नाना वाद प्रकरणातील दिग्दर्शक राकेश सारंग हा त्यांचा मुलगा. लालन सारंग यांचा ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा विद्याताई माडगूळकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव या पुरस्कारानं सन्मान करण्यात आला होता . पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे कलागौरव पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं. कणकवली येथे झालेल्या ८७व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या निधनामुळे कला विश्वात शोककळा पसरलीय.


लालन सारंग यांचे कलाविश्वातील योगदान

आक्रोश (वनिता)

आरोप (मोहिनी)

उद्याचा संसार 

उंबरठ्यावर माप ठेविले 

कमला (सरिता)

कालचक्र (दिग्दर्शन आणि अभिनय)

खोल खोल पाणी (चंद्राक्का)

गिधाडे (माणिक)

घरकुल

घरटे अमुचे छान (विमल)

चमकला ध्रुवाचा तारा 

जंगली कबुतर (गुल)

जोडीदार (शरयू)

तो मी नव्हेच 

धंदेवाईक (चंदा)

बिबी करी सलाम

बेबी (अचला)

मी मंत्री झालो 

रथचक्र ( ती)

राणीचा बाग

लग्नाची बेडी 

सखाराम बाइंडर (चंपा)

संभूसांच्या चाळीत 

सहज जिंकी मना (मुक्ता)

सूर्यास्त (जनाई)

स्टील फ्रेम (हिंदी)

Web Title: Veteran actress Lalan Sarang passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.