Join us  

ज्येष्ठ उद्योजक भाई सावंत यांचे निधन

By admin | Published: January 05, 2016 2:55 AM

ज्येष्ठ उद्योजक, माजी आमदार नीळकंठ जनार्दन म्हणजेच भाई सावंत यांचे रविवार, ३ जानेवारीला रात्री साडेदहा वाजता कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले

मुंबई : ज्येष्ठ उद्योजक, माजी आमदार नीळकंठ जनार्दन म्हणजेच भाई सावंत यांचे रविवार, ३ जानेवारीला रात्री साडेदहा वाजता कोल्हापूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, स्नुषा, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सोमवारी दुपारी गोरेगाव येथे त्यांच्या पार्थिव देहावर अत्यंसंस्कार करण्यात आले. व्हॅक्युम पंपाच्या उद्योगात त्यांनी आपले नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले होते. सावंत हे उद्योजक होण्याचे स्वप्न घेऊन रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथून मुंबईत आले होते. उद्योगासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि अभ्यासही केला. त्यातूनच त्यांनी जे. बी. सावंत उद्योगसमूहाची सुरुवात केली. गोरेगाव, ठाणे, नाशिक आणि वापीमध्ये उद्योगाच्या शाखा स्थापन केल्या. वयाच्या ८१ व्या वर्षीही ते फॅक्टरीत जात. रोज ते गोरेगाव ते ठाणे प्रवास करत. शास्त्रज्ञ होमी भाभा यांच्यापासून उद्योजक शंतनुराव किर्लोस्करांपर्यंत अनेकांच्या पसंतीला उतरलेला आणि आयातीला पर्याय ठरलेला व्हॅक्युम पंप बनवणे हे सावंत यांचे योगदान आहे. त्यांनी फाउंड्री, काच, मसाले निर्यातही केली.