मुंबई : कलाकृतीतून भारतीयत्व टिकवणारे मध्य प्रदेशातील ज्येष्ठ चित्रकार लक्ष्मण भांड यांचे शुक्रवारी सायंकाळी भोपाळमध्ये निधन झाले, ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शांताबाई, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मध्य प्रदेशातील नामवंत चित्रकार बेंद्रे, रझा, स्वामीनाथन यांच्यामधील अखेरचे ज्येष्ठ चित्रकार म्हणून त्यांची ओळख होती.भांड यांनी सुरुवातीच्या काळात ग्वाल्हेरमध्ये आणि नंतर मुंबईतील जे.जे. स्कूल आॅफ आर्टमध्ये कलेचे शिक्षण घेतले. भोपाळच्या ऱ्हिदम आर्ट सोसायटीचे, तसेच ग्वाल्हेरच्या आर्टिस्ट कम्बाईन व कल्चरल सोसायटीचे ते संस्थापक सदस्य होते. मध्य प्रदेशातील भांड स्कूल आॅफ आर्टच्या माध्यमातून कला शिक्षण देण्याचे काम त्यांनी केले. देहदान व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांचे पार्थिव शनिवारी दुपारी भोपाळच्या चिरायू मेडिकल कॉलेजकडे सोपविण्यात आले. (प्रतिनिधी)
ज्येष्ठ चित्रकार लक्ष्मण भांड यांचे निधन
By admin | Published: October 16, 2016 3:11 AM