'बाटु'च्या कुलगुरुपदी डॉ. कारभारी काळे यांची नियुक्ती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 07:12 PM2021-12-31T19:12:34+5:302021-12-31T19:12:59+5:30

डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ वेदला रामा शास्त्री यांनी वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.

As the Vice Chancellor of 'Batu', Dr. Appointment of Karbhari Kale | 'बाटु'च्या कुलगुरुपदी डॉ. कारभारी काळे यांची नियुक्ती  

'बाटु'च्या कुलगुरुपदी डॉ. कारभारी काळे यांची नियुक्ती  

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र  विद्यापीठाचे कुलगुरु डॉ वेदला रामा शास्त्री यांनी वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.

मुंबई - राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ कारभारी विश्वनाथ काळे यांची लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र  विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे. डॉ कारभारी काळे हे सध्या औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संगणक विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभागात वरिष्ठ प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करेपर्यंत, यापैकी जे अगोदर असेल त्या दिवसापर्यंत केली आहे. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र  विद्यापीठाचे कुलगुरु डॉ वेदला रामा शास्त्री यांनी वैयक्तिक कारणांमुळे पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर मुंबई येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (आयसीटी) कुलगुरु डॉ. अनिरुध्द पंडित यांच्याकडे २८ मार्च २०२१ रोजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.


 
डॉ. कारभारी काळे (जन्म २ ऑगस्ट १९६२) यांनी भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपालांनी संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष तसेच संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव डॉ. जी. सतीश रेडडी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्था, नागपुरचे संचालक प्रा.प्रमोद पडोळे आणि महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव ओम प्रकाश गुप्ता हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. कारभारी काळे यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

Web Title: As the Vice Chancellor of 'Batu', Dr. Appointment of Karbhari Kale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.