कुलगुरू पदासाठी आले कमी अर्ज! ९७ उमेदवार इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:40 AM2018-02-18T00:40:01+5:302018-02-18T00:40:26+5:30

आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीच्या गोंधळानंतर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर, नवीन कुलगुरू पदाचा शोध सुरू झाला आहे. त्यासाठी शोध समितीकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, परंतु या वेळी केवळ ९७ अर्जच दाखल झाले आहेत. गेल्या वेळी कुलगुरू पदासाठी तब्बल १५० अर्ज आले होते.

Vice Chancellor nominated for lower post! 9 7 Candidates Interested | कुलगुरू पदासाठी आले कमी अर्ज! ९७ उमेदवार इच्छुक

कुलगुरू पदासाठी आले कमी अर्ज! ९७ उमेदवार इच्छुक

Next

मुंबई : आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीच्या गोंधळानंतर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यानंतर, नवीन कुलगुरू पदाचा शोध सुरू झाला आहे. त्यासाठी शोध समितीकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, परंतु या वेळी केवळ ९७ अर्जच दाखल झाले आहेत. गेल्या वेळी कुलगुरू पदासाठी तब्बल १५० अर्ज आले होते.
मुंबई विद्यापीठाचे यंदाचे १६०वे वर्ष आहे. शिक्षण क्षेत्रातील नामांकित विद्यापीठ म्हणून मुंबई विद्यापीठाचे नाव घेतले जाते, पण गेल्या काही महिन्यांत विद्यापीठाच्या परीक्षा विभागात सुरू असलेल्या गोंधळामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन झाली आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीच्या गोंधळामुळे राज्यपाल व कुलपती सी. विद्यासागर राव यांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून काढून टाकले. त्यानंतर, कुलगुरूंच्या निवडीसाठी एका शोध समितीची स्थापना करण्यात आली. मुंबई विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ. ए. डी. सावंत यांनी या समितीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत, यूजीसीच्या नियमानुसार ही समिती गठीत करणे गरजेचे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते.
त्यानंतर, आता या शोध समितीकडे ९७ अर्ज आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या वेळी कुलगुरू पदासाठी तब्बल १५० अर्ज आले होते. यावेळी केवळ ९७ अर्ज आले आहेत.

प्रक्रियेत बदल नाहीत
कुलगुरूंच्या निवडीसाठी स्थापन केलेल्या शोध समितीवर आक्षेप घेत, मुंबई विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ. ए. डी. सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावेळी यूजीसीच्या नियमानुसार समिती गठित करणे गरजेचे असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मात्र न्यायालयाने प्रक्रियेस स्थगिती दिलेली नसल्याने, निवड प्रक्रियेत बदल करण्यात आलेले नाहीत.

Web Title: Vice Chancellor nominated for lower post! 9 7 Candidates Interested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.