Join us

कुलगुरूंना कोर्टाचा दिलासा

By admin | Published: July 04, 2015 3:29 AM

मुंबई व शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी झालेल्या अनुक्रमे डॉ. संजय देशमुख व डॉ. डी. बी. शिंदे यांच्या नेमणुकांना आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने

मुंबई : मुंबई व शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी झालेल्या अनुक्रमे डॉ. संजय देशमुख व डॉ. डी. बी. शिंदे यांच्या नेमणुकांना आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. सुरेश पाटील-खेडे यांनी ही याचिका केली होती. या नियुक्त्या महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार झाल्या नसल्याने त्या गैर आहेत. त्यामुळे या नियुक्त्या रद्द कराव्यात, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. कुलपती व राज्यपालांच्या वतीने ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली. विद्यापीठ आयोगाची नियमावली बंधनकारक नसून, त्या केवळ शिफारशी आहेत. त्यामुळे या नियुक्त्या नियमानुसारच झाल्याचे कुंभकोणी यांनी हायकोर्टाला सांगितले. (प्रतिनिधी)