वर्सोव्याच्या शाळेत उपमुख्याध्यापकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 04:50 AM2018-08-11T04:50:44+5:302018-08-11T04:50:51+5:30
वर्सोव्यातील सी.डी. बर्फीवाला शाळेच्या उपमुख्याध्यापकांनी शुक्रवारी सकाळी शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
मुंबई : वर्सोव्यातील सी.डी. बर्फीवाला शाळेच्या उपमुख्याध्यापकांनी शुक्रवारी सकाळी शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पत्नीशी सतत होणाऱ्या वादातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. डी. एन. नगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
राम कांबळे (४८) असे आत्महत्या केलेल्या उपमुख्याध्यापकाचे नाव आहे. कांबळे यांनी शुक्रवारी सकाळी साडे आठच्या सुमारास बर्फीवाला शाळेच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनास पाठविण्यात आल्याचे डी.एन. नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांनी सांगितले. कांबळे यांना एक मुलगा आहे. मुलगा त्यांच्याशी बोलत नव्हता तर पत्नीचे दुसºया व्यक्तीशी संबंध होते. त्यातून दोघांमध्ये खटके उडत होते. म्हणूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलसांनी वर्तवला.