पिंपरीपाडा, आंबेडकर नगरमधील दुर्घटनाग्रस्त अद्याप बेघरच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 03:32 AM2019-08-12T03:32:51+5:302019-08-12T03:33:58+5:30

मालाड पूर्वेकडील कुरार व्हिलेज येथील पिंपरीपाडा आणि आंबेडकर नगर मधील झोपडपट्टीवर महापालिकेच्या जल अभियंता विभागाची संरक्षण भिंत कोसळली होती.

Victim of Malad Wall Collapse still homeless | पिंपरीपाडा, आंबेडकर नगरमधील दुर्घटनाग्रस्त अद्याप बेघरच

पिंपरीपाडा, आंबेडकर नगरमधील दुर्घटनाग्रस्त अद्याप बेघरच

Next

मुंबई : मालाड पूर्वेकडील कुरार व्हिलेज येथील पिंपरीपाडा आणि आंबेडकर नगर मधील झोपडपट्टीवर महापालिकेच्या जल अभियंता विभागाची संरक्षण भिंत कोसळली होती. या दुर्घटनेमध्ये ३० जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेनंतरही येथील रहिवासी अद्याप बेघर आहेत.

पालिका आणि वनविभाग यांच्यातील चर्चेनुसार काही रहिवाशांचे माहूल येथे तात्पुरते पुनर्वसन केले जाणार आहे. माहूल परिसर हा प्रदुषित असल्याचे येथील स्थानिकांचे म्हणणे असून, शासन दुर्घटनाग्रस्तांचा आणखी जीव धोक्यात घालत आहे, असेही रहिवासी म्हणाले.
‘सम्यक’ सामाजिक गटाचे सदस्य योगेश बोले यांनी सांगितले की, पिंपरीपाडा आणि आंबेडकर नगर येथील दुर्घटनाग्रस्त नाईलाजापोटी माहूलमध्ये राहण्यास तयार झाले आहेत. वनविभाग आणि महापालिकाकडूनही १०२ दुर्घटनाग्रस्तांना घरांच्या चाव्या देण्यासाठी नुकतीच बैठक बोलाविण्यात आली. एकीकडे महापालिका सांगते की, दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांचे आहे तिथेच पुनर्वसन केले जाईल. दुसरीकडे वनविभाग सांगते की, दुर्घटनाग्रस्तांना माहूलमध्ये घरे दिली जातील. शासनाच्या वेळखाऊ वृत्तीमुळे दुर्घटनाग्रस्त अजूनही बेघर आहे.

सध्या येथील रहिवासी शेजाऱ्यांकडे किंवा नातेवाईकाकडे आसरा घेत आहेत. ज्यांच्याकडे थोडे फार पैसे आहेत. त्यांनी भाड्यांचे घर घेतले आहे. काही लोकांकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे ते त्याच जागी झोपडी बांधून राहत आहेत. घटनेला ४० दिवस उलटल्यानंतर आता माहूलमध्ये पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शासन एकीकडे माहूलसारख्या प्रदुषित भागात घरे देऊन नागरिकांना मृत्यूच्या जवळ नेत आहे? अशी खंत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

पालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत ठळक मुद्दे
येत्या काही दिवसांत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना पाच लाख रूपये जाहिर केलेली रक्कम देऊ.
जखमी आणि नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा त्वरीत दिली जाईल.
मृत नागरिकांच्या कुटुंबियांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करू
माहूल येथे जाणार नाहीत त्या ३०० कुटुंबियासाठी आप्पापाडा येथे सुरू असलेल्या शिवशाही प्रकल्पात घरे देण्याचा प्रयत्न करू.

सध्या आम्ही पक्क्या चाळीमध्ये भाड्याच्या घरात राहत आहोत. आंबेडकर नगरमध्ये भिंत कोसळून पाण्याच्या प्रवाहामध्ये घरातील सातजण वाहून गेले होते. त्यावेळी आई-वडील आणि छोटी बहिण यांचा दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. आम्हाला माहूलमध्ये घर दिले जाणार असे बोलले जात आहे.
- राधेश्याम शर्मा, दुर्घटनाग्रस्त, आंबेडकर नगर

Web Title: Victim of Malad Wall Collapse still homeless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.