पाच वर्षांत चार वेळा लैंगिक अत्याचाराची बळी
By admin | Published: July 9, 2017 02:27 AM2017-07-09T02:27:12+5:302017-07-09T02:27:12+5:30
मानखुर्दमधील १५ वर्षांच्या मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचाराने मुंबई हादरली. धक्कादायक बाब म्हणजे, यापूर्वीही आजोबा, मावस भाऊ व नातेवाईकाकडून तिच्यावर
Next
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मानखुर्दमधील १५ वर्षांच्या मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचाराने मुंबई हादरली. धक्कादायक बाब म्हणजे, यापूर्वीही आजोबा, मावस भाऊ व नातेवाईकाकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. या अत्याचारामुळे मुलीला मानसिक धक्का बसला असून, तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडित १५ वर्षांची (नेहा) मानखुर्द परिसरात आई आणि सावत्र वडिलांसोबत राहते. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आजोबांच्या विकृतीची ती पहिल्यांदा शिकार ठरली. या प्रकरणात तिच्या आजोबांना शिक्षाही झाली. मात्र, यानंतर नेहाकडे बघण्याचा नातेवाईकांचा दृष्टिकोन बदलला.