केईएम रुग्णालयात स्वाइन फ्लूने घेतला तरुणीचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 06:19 AM2019-07-15T06:19:57+5:302019-07-15T06:20:10+5:30
राज्यात स्वाइनचा प्रादुर्भाव वाढत असून, मुंबईत एका तरुणीचा स्वाइनने मृत्यू झाला आहे.
मुंबई : राज्यात स्वाइनचा प्रादुर्भाव वाढत असून, मुंबईत एका तरुणीचा स्वाइनने मृत्यू झाला आहे. दानिश्ता खान असे या तरुणीचे नाव असून, तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. तर राज्यात जानेवारीपासून १९१ जणांचा, तर मुंबईत चार जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.
उष्णतेच्या आगमनासोबत नाहीशा होणाऱ्या स्वाइन फ्लूने यंदा राज्यात मुक्काम केला. त्यात आता प्ोावसाळ्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढत आहे. जानेवारी महिन्यापासून राज्यभरात १९१ जणांचा बळी गेला आहे, तर मुंबईत चार मृत्यू झाले आहेत. राज्यात नाशिकमध्ये सर्वाधिक ३६ रुग्णांचा बळी गेला आहे. त्यानंतर, नागपूरमध्ये २५ रुग्ण स्वाइन फ्लूमुळे दगावले आहेत, तर राज्यात तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यात पुणे मनपातील २ आणि नागपूरमधील एकाचा समावेश आहे.
केईएम रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, केईएम रुग्णालयात गोवंडी येथे राहणाºया २६ वर्षीय दानिश्ता खान हिचा मृत्यू झाला आहे. तिला ८ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिला लेप्टोचीही लागण झाली होती. तिच्यावर एमआयसीयू विभागात उपचार सुरू होते. तिने १३ जुलै रोजी शनिवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, याखेरीज, मुंबईत जानेवारी महिन्यापासून २३७ रुग्णांची नोंद करण्यात आली, तर चार बळी गेले आहेत. जानेवारी ते जुलै या काळात राज्यात तपासण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या १४ लाख २४ हजार ३५० इतकी आहे. तर आॅसेलटॅमिवीर दिलेले संशयित फ्लू रुग्ण २२ हजार ३७६ एवढे आहेत. राज्यातील बाधित रुग्णांची संख्या १ हजार ७४५ असून, सध्या रुग्णालयात भरती असलेले रुग्ण ८६ आहेत. यात उपचार करून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १,४७० इतकी आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने स्वाइन फ्लूच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्यातील फ्लू सदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे. याशिवाय विनाविलंब उपचार, विलगीकरण कक्ष, प्रतिबंधक लसीकरण, साथरोग प्रतिबंध व नियंत्रक समितीची स्थापना करणे अशा विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
मान्सून कालावधीत स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ नये, यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात येत आहे.
>राज्यभरात ३२,१२३ व्यक्तींना लसीकरण
राज्य शासनाच्या वतीने अतिजोखमीच्या व्यक्तींसाठी ऐच्छिक व मोफत इन्फल्युएंजा लसीकरण उपलब्ध करण्यात आले आहे. सध्या दुसºया व तिसºया तिमाहीतील गर्भवतींसोबतच मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाºया व्यक्तींना, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. जानेवारी ते जुलै या काळात ३२ हजार १२३ व्यक्तींना लसीकरण करण्यात आले आहे.
>सर्वाधिक बळी गेलेल्या
जिल्ह्यांची आकडेवारी
जिल्हा मृत्यू
नाशिक ३६
नागपूर २५
अहमदनगर १६
पुणे मनपा १३
कोल्हापूर ९