त्या पीडितेवर नायर रुग्णालयात उपचार

By admin | Published: May 18, 2017 02:27 AM2017-05-18T02:27:42+5:302017-05-18T02:27:42+5:30

सामूहिक बलात्कारानंतरही ती भोगते आहे मरणयातना या मथळ््या खाली वृत्त लोकमतच्या बुधवारच्या अंकात प्रसिध्द होताच जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी तातडीने

The victim treated Nair at the hospital | त्या पीडितेवर नायर रुग्णालयात उपचार

त्या पीडितेवर नायर रुग्णालयात उपचार

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

पालघर/नंडोरे : सामूहिक बलात्कारानंतरही ती भोगते आहे मरणयातना या मथळ््या खाली वृत्त लोकमतच्या बुधवारच्या अंकात प्रसिध्द होताच जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी तातडीने या महिलेला दोन लाखाची मदत तिची भेट घेऊन दिली.
जिल्हाधिकाऱ्यांनी एका मानसोपचार तज्ज्ञाचीही नियुक्ती तिच्या समुपदेशनासाठी केली. तसेच तिच्यावर पुढील उपचार करण्यासाठी त्यांनी आरोग्य यंत्रणेतील ज्येष्ठ अधिकारी नियुक्त केला असून तो तिला गुरूवारी नायर रूग्णालयात दाखल करणार आहे. तेथील डीन आणि विभाग प्रमुख यांच्याशी चर्चा करून तिच्यावर उपचार केले जाणार आहेत.
हे वृत्त प्रसिध्द होताच जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय योजनेतून तात्काळ मदत करण्याचा निर्णय घेतला. ही अंमलबजावणी ठाणे-पालघर-ठाणे अशी लटकू नये म्हणून त्यांनी हा कार्यभार पुन्हा पूर्वीच्या अधिकाऱ्याकडेच सुपूर्द केला आणि निर्णयाची अंमलबजावणी करून घेतली. तसेच जिल्हा पोलीस अधिक्षकांना दूरध्वनी करून, या प्रकरणातील आरोपींवरील खटला लवकरात लवकर दाखल करण्याचा व आरोपींना कठोर सजा होईल अशा रीतीने केस फाईल करण्याचेही निर्देश दिले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत अशा पीडित महिलांना मनोधैर्य योजनाअंतर्गत मदत केली जाते. त्यानुसार तिला जिल्हाधिकाऱ्यांनी महिला व बालकल्याण सभापती विनिता कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्यासह रूणालयात तिच्या पतीची भेट घेऊन शासनामार्फत २ लाखांचा धनादेश सुपूर्द केला. यातील ५० हजार रु पये त्वरित धनादेश व १ लाख ५० हजार रु पयाचा धनाकर्ष अशा स्वरूपात देण्यात आले.

मनोबल वाढवणार
- हे वृत्त प्रसिध्द होताच जिल्हाधिकाऱ्यांनी शासकीय योजनेतून तात्काळ मदत करण्याचा निर्णय घेतला.त्यांनी दोन लाख रूपयांची मदतही केली.
- आरोपीना कठोर शासन होईल असे स्पष्ट करून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी तिचे मनोबल वाढविण्यासाठी आपण तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.

Web Title: The victim treated Nair at the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.