अपुऱ्या सुविधांनी घेतला बालकासह मातेचा बळी
By admin | Published: November 16, 2016 05:41 AM2016-11-16T05:41:43+5:302016-11-16T05:41:43+5:30
तालुक्यातील मौजे सांगे (भेकरीचा पाडा) येथील नीता नितीन तुंबडा (२४) या आदिवासी महिलेला ग्रामीण रुग्णालयांतील अपुऱ्या सोयींमुळे प्रसूतीदरम्यान
वसंत भोईर / वाडा
तालुक्यातील मौजे सांगे (भेकरीचा पाडा) येथील नीता नितीन तुंबडा (२४) या आदिवासी महिलेला ग्रामीण रुग्णालयांतील अपुऱ्या सोयींमुळे प्रसूतीदरम्यान बाळासह जीव गमवावा लागला आहे. नीता तुंबडा या महिलेला प्रसूतीसाठी वाडा ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी दाखल करण्यात आले. मात्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुविधांअभावी तिला ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला, परंतु ती तिथे दाखल न होता, घरी गेली. त्यानंतर, काही वेळातच तिने मृत बालकास जन्म दिला व त्यानंतर, तिचाही मृत्यू ओढावला.
भेकरीचा पाडा येथे एका लहानशा झोपडीत ही महिला कुटुंबीयांसह राहात होती. राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या गालतरे गावापासून हे गावव हाकेच्या अंतरावर आहे. असे असूनही सुविधा नसल्याने हा प्रकार घडला.