बसखाली चिरडून पोलिसाच्या मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 04:36 AM2018-06-13T04:36:35+5:302018-06-13T04:36:35+5:30
भोईवाडा येथे बसखाली चिरडून पोलीस हवालदाराच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. साहिल कदम (१९) असे मुलाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनोळखी बसचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई - भोईवाडा येथे बसखाली चिरडून पोलीस हवालदाराच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. साहिल कदम (१९) असे मुलाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनोळखी बसचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
बीडीडी चाळ परिसरात साहिल हा आई-वडिलांसोबत राहायचा. त्याचे वडील नायगाव पोलीस मुख्यालयात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत.
सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तो दुचाकीवरून हिंदमाता येथून चित्रा टॉकीजच्या दिशेने निघाला. त्या वेळी बसने डावीकडे वळण घेतले आणि बसची दुचाकीला धडक बसल्याने साहिल थेट बसच्या चाकाखाली आला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी अनोळखी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी दिली.
घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस बसचालकाचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे कदम कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.