मुंबई : वांद्रे शिवसेनेचेच असल्याचे शिवसैनिकांनी दाखवून दिले. तृप्ती सावंत जिंकल्या या आनंदापेक्षाही नारायण राणे पराभूत झाले, याचा आनंद प्रत्येक शिवसैनिकाला झाला. शिवसैनिक मुळातच खमक्या म्हणून ओळखला जातो. त्यात नारायण राणे प्रतिस्पर्धी असतील, तर मग विचारायलाच नको. नारायण राणेंनी वांद्र्यात प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. काँग्रेस एकत्र आल्यासारखी वाटत होती. हा प्रचार ‘हायप्रोफाईल’ संज्ञेत मोडणारा होता. शिवसेनेने मात्र ‘लो-प्रोफाईल’ राहत अत्यंत शिस्तबद्ध प्रचार केला. शिवसेनेला विजय मिळवून देण्यात पडद्यामागील अनेक शिलेदारांनी चोख भूमिका पार पाडली. शिवसेनेच्या रणनीतीकारांमध्ये आघाडीवर होते ते म्हणजे विभागप्रमुख, आमदार अनिल परब. विभागप्रमुख नात्याने त्यांच्यावर मुख्य जबाबदारी असली तरी कोकणात राणेंना धूळ चारणारे खासदार विनायक राऊत आणि शिवसेनेचे जुने निष्ठावंत संजय पोतनीस यांनीही या पोटनिवडणुकीत ‘चाणक्या’ची भूमिका पार पाडली. सेना उमेदवार ९ ते १० हजार मतांनी निवडून येईल, असा शिवसेनेचा अंदाज होता. पण नारायण राणे समोर असल्याने हा आकडा तब्बल दुप्पट झाला. उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत सावध राहण्याचे केलेले आवाहन शिवसैनिकांनी तंतोतंत पाळले आणि संघटनात्मक बांधणीचा विजय झाला.यापूर्वी अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी शिवसेनेसारखी करायची आहे, असे शरद पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादीच्या वॉर्डांनी शिवसेनेच्या शाखेसारखे काम करावे, असेही ते कार्यकर्त्यांना सांगत असतात. प्रत्यक्षात हे काम कसे चालते, हे वांद्रे निवडणुकीत बघायला मिळाले. नारायण राणे यांनी अनेक नेते, पक्ष, संघटना यांची जोरदार मोट बांधली होती. त्यामुळे ही निवडणूक ‘हायप्रोफाईल’ बनली. शिवसेनेने मात्र कोणताही तोल ढळू न देता तळागाळात काम केले. वांद्रे निवडणुकीत २६४ पैकी ८० बूथ मुस्लीम बहुल होते. पैकी १७५ गैर मुस्लीम बूथसाठी शिवसेनेने चांगलीच बांधणी केली होती. १७५ बूथवर प्रत्येकी १० शिवसैनिकांना जबाबदारी देण्यात आली होती. ती जबाबदारी प्रत्येकाने शेवटपर्यंत पूर्ण क्षमतेने निभावली. मर्यादित जबाबदारी असल्याने त्यावर लक्ष केंद्रित करणे, या शिवसैनिकांना सोपे गेले. फार मोठ्या सभा किंवा प्रचार रॅली न करता तळागाळापर्यंत पोहोचण्यावर भर दिल्याने त्याचा परिणाम निकालात दिसून आला. विशेष म्हणजे भाजपची पोटनिवडणुकीत उपस्थिती दिसली पण सहभाग जाणवला नाही, हे प्रकर्षाने म्हणावे लागेल. (प्रतिनिधी)च्भाजप - राणेंच्या विजयामुळे शिवसेनेकडून होणारी टीका कमी होऊन राणेविरुद्ध शिवसेना सामना जास्त रंगला असताच्शरद पवार - महापालिका निवडणुकीत सेनेचे मनोधैर्य खचवण्यासाठी राणेंचा विजय गरजेचा होताच्काही पत्रकारांना - सरकारविरुद्ध सडेतोड बोलणारा नेता म्हणून राणेंची भूमिकाच्राज ठाकरेंना - स्वाभिमान संघटनेला बळकटी मिळून स्वाभिमानविरुद्ध शिवसेना सामना रंगला असता, त्याचा फायदा मनसेला झाला असता
‘लो-प्रोफाईल’ शिलेदारांमुळे विजय
By admin | Published: April 17, 2015 12:14 AM