Join us

राज्यात सर्वाधिक गारठा विदर्भात; २० अंशावरची मुंबई ढगाळ राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 5:50 AM

मुंबईचे किमान तापमान बुधवारी २०.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान ब्रह्मपुरी येथे १२.१ अंश नोंदविण्यात आले आहे.

मुंबई : मुंबईचे किमान तापमान बुधवारी २०.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वात कमी किमान तापमान ब्रह्मपुरी येथे १२.१ अंश नोंदविण्यात आले आहे. विशेषत: बुधवारी राज्यात सर्वाधिक गारठा विदर्भात नोंदविण्यात आला असून, विदर्भात काही ठिकाणी पाऊसही नोंदविण्यात आला आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाडा आणि कोकण, गोवा, विदर्भाच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.राज्यासाठी अंदाज९ जानेवारी : विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.१० ते १२ जानेवारी : गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील.मुंबईसाठी अंदाज९ जानेवारी : मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३१, १८ अंशाच्या आसपास राहील.१० जानेवारी : मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश मुख्यत: निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २० अंशांच्या आसपास राहील.