मुंबई - क्रॉफर्ड मार्केट परिसरात आज सायंकाळी ६.०० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथील धोबी तलाव परिसरात ही आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्नीशामन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या क्रॉफर्ड मार्केटमधून लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, खूप दिवसांनी सुरु झालेल्या कामकाजामुळे शॉर्ट सर्किटने आग लागल्याचं म्हटलं जात आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहेत. आग लागल्यानंतर धुराचे लोट मोठ्या प्रमाणात परिसरात पसरले आहेत. धुराचे लोट हे दूरपर्यंत दिसत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहेत. आग लागल्यानंतर धुराचे लोट मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि मोहम्मद अली रोड परिसरात पसरले आहेत. नजीकच मुंबई पोलीस आयुक्तालय देखील आहे. अत्यंत दाटीवाटीच्या असा हा परिसर असतो. मात्र, लॉकडाऊननंतर हळूहळू मुंबई पूर्वपदावर येत असताना तितकी वर्दळ नव्हती. घटनास्थळी मुंबई अग्निशमन केंद्राचे ६ फायर वाहन, ५ वॉटर टँकर व १ रेसक्यू वाहन घटनास्थळी उपस्थित असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. सदर घटनास्थळी अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.