Join us

Video : मृतदेहाला घेऊन निघालेली रुग्णवाहिका पुलावरुन कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2020 2:22 PM

डोंबिवलीवरुन एक रुग्णवाहिका शवविच्छेदनासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात मृतदेह घेऊन रवाना झाली होती. मात्र, चेम्बुरमधील अमर महालजवळ असलेल्या टेम्बे ब्रीजवळ या रुग्णावाहिकेचा अपघात झाला.

ठळक मुद्देडोंबिवलीवरुन एक रुग्णवाहिका शवविच्छेदनासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात मृतदेह घेऊन रवाना झाली होती. मात्र, चेम्बुरमधील अमर महालजवळ असलेल्या टेम्बे ब्रीजवळ या रुग्णावाहिकेचा अपघात झाला.

मुंबई - देशात आणि राज्यात कोरोना महामारीमुळे वैद्यकीय क्षेत्राचं काम व तणाव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे, सातत्याने रुग्णांच्या सेवेसाठी कर्मचाऱ्यांची धावपळ होत आहे. रुग्णवाहिकेतून सतत रुग्णांची ने-आण करण्यात येत असल्याचे दिसून येते. गुरुवारी रात्री एका रुग्णवाहिकेला अपघात झाल्याची घटना घडली. चेम्बुरमधील अमर महाल येथील टेम्बे पुलावरुन ही रुग्णावाहिका खाली कोसळली. यावेळी, स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेतील वाहक व स्टाफला बाहेर काढण्यात आले. 

डोंबिवलीवरुन एक रुग्णवाहिका शवविच्छेदनासाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात मृतदेह घेऊन रवाना झाली होती. मात्र, चेम्बुरमधील अमर महालजवळ असलेल्या टेम्बे ब्रीजवळ या रुग्णावाहिकेचा अपघात झाला. थेट पुलावरुन रुग्णावाहिका बाजूलाच कोसळली. पुलाखालील दुकानांच्या पत्र्यावर, स्लॅबवर ही रुग्णवाहिका लटकली होती. त्यावेळी, गाडीचा ड्रायव्हर, कर्मचारी आणि मृतदेहासह सर्वजजण 1 तासापेक्षा जास्त काळ रुग्णवाहिकेतच अडकून पडले होते. अखेर, टिळक नगर पोलीस आणि फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल २ तासानंतर या सर्वांची सुटका केली.  वाहन उंचीवर अडकल्याने ते खाली काढण्यासाठी आम्ही क्रेनला बोलावून घेतलं आहे, त्यानंतर रुग्णवाहिका खाली घेण्यात येईल. स्थानिकांनी ड्रायव्हर आणि कर्मचाऱ्याला बाहेर काढलं असून ते सुखरुप असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. संबंधित रुग्णवाहिकेत एका खून झालेल्या व्यक्तीचा मृतदेह होता. सुरेश पाल असे या मृत व्यक्तीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या खूनप्रकरणी दोघांना अटक केली असून एकजण फरार आहे. मात्र, रुग्णवाहिकेतून मृतदेह नेत असताना एकही पोलीस सोबतीला नव्हता.  

टॅग्स :अपघातमुंबईवैद्यकीयजे. जे. रुग्णालयचेंबूर