Video : मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा कवच भेदून अनोळखी कार ताफ्यात घुसली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 08:13 PM2022-06-17T20:13:03+5:302022-06-17T20:13:38+5:30

CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुरक्षा कवच भेदून एका व्यक्तीने त्याची कार थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसवली.

Video: An unidentified car broke through the security shield of the Chief Minister and entered the convoy | Video : मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा कवच भेदून अनोळखी कार ताफ्यात घुसली

Video : मुख्यमंत्र्यांचे सुरक्षा कवच भेदून अनोळखी कार ताफ्यात घुसली

Next

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच सुरक्षेत पोलिसांकडून मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर गेले होते. तिथून परतत असताना धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत आहि. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामधील गाड्यांचा वेग कमी असल्याने हा अपघात टळला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुरक्षा कवच भेदून एका व्यक्तीने त्याची कार थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसवली.

या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात असेलल्या गाड्यांसमोर समोरच त्याची कार घुसवल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नं चिन्हं उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारचा ताफा राजभवन येथून वर्षा निवास्थानी जात असताना एका व्यक्तीने त्याची कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुरक्षाकडे तोडून मध्येच घुसवली.  त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारचा ताफा अचनाक तात्काळ थांबवावा लागला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या कोणत्याही पोलिसांनी या व्यक्तीची कार अडवली नाही वा त्याला जाबही विचारला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सुरक्षा तोडणाऱ्या उच्चभ्रू व्यक्तीला ताब्यात न घेता त्याची कोणतीही चौकशी न करता कसे काय सोडले? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title: Video: An unidentified car broke through the security shield of the Chief Minister and entered the convoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.