Join us

VIDEO: भावना गवळींनी ७० कोटींची ट्रस्ट त्यांच्या 'पीए'च्या नावे केली; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 1:52 PM

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही याप्रकरणात भावना गवळींच्या ट्रस्ट संदर्भात काही गंभीर आरोप केले आहेत.

वाशिम येथील शिवसेनच्या खासदार भावना गवळी ( Bhavana Gawali ) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. खासदार गवळींच्या ५ संस्थांवर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) छापे टाकले. त्यानंतर काही सवाल 'ईडी'नंही उपस्थित केले आहेत. आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही याप्रकरणात भावना गवळींच्या ट्रस्ट संदर्भात काही गंभीर आरोप केले आहेत. भावना गवळी यांनी ७० कोटींची ट्रस्ट गैरपद्धतीनं त्यांच्या 'पीए'च्या नावावर केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 

"भावना गवळी यांनी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, ट्रस्टचं परिवर्तन महिला उत्कर्ष प्रतिष्ठान प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये केलं आहे. ते करताना त्यांनी जी कागदपत्रं वापरली त्यात गैरप्रकार करण्यात आल्याची तक्रार माझ्याकडे आली होती. खोट्या पद्धतीनं ट्रस्टचं रुपांतर कंपनीत करण्यात आलं आहे. त्यामुळे या गैरप्रकाराचा तपास व्हायला हवा अशी आमची मागणी आहे", असं किरीट सोमय्या म्हणाले. यासोबतच या ट्रस्टमध्ये ७० कोटींची संपत्ती जी ट्रस्टची होती ती भावना गवळींनी त्यांच्या पीएच्या नावावर केली आहे, असा खळबळजनक आरोप सोमय्या यांनी यावेळी केला आहे. 

एकतानगर परिसरातील कंत्राटदार सईद खान ऊर्फ गब्बर यांच्या घरी ३० ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांची छापा टाकला. इडीचे पथकाने तीन तास घराची झाडाझडती घेतली आहे. वाशिम येथील खा.भावना गवळी यांच्याशी संदर्भात असलेल्या कामांमध्ये सईद खान यांची भागीदारी असल्याची माहिती समोर आली होती. वाशिम येथील खा. भावना गवळी यांच्याशी संदर्भात असलेल्या कामांमध्ये सईद खान यांची भागीदारी असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळेच ही धाड टाकल्याची माहितीही पुढे आली आहे. काल सायंकाळी सव्वापाच वाजेपर्यंत अधिकाऱ्यांची झडती सुरू होती. दरम्यान, नेमकी काय कारवाई झाली, याचा तपशील मिळू शकला नाही.

टॅग्स :किरीट सोमय्याशिवसेना