Video: अभिनेता अक्षय कुमारच्या 'त्या' जाहिरातीवर शिवप्रेमींचा संताप; माफी मागा अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 05:00 PM2020-01-06T17:00:28+5:302020-01-06T17:01:13+5:30
या जाहिरातीमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जात असून सरकारने निरमाच्या जाहिरातीवर लवकर बंदी आणावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने केलेल्या जाहिरातीमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. निरमा पावडरच्या जाहिरातीमध्ये अक्षय कुमार आणि इतर कलाकारांना मावळ्याच्या वेशात दाखविण्यात आलं असून या जाहिरातीमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याची संतप्त भावना शिवप्रेमींनी मांडली आहे.
या जाहिरातीत दाखविण्यात आलं आहे की, अक्षय कुमार आणि इतर मावळे लढाई करुन पुन्हा आपल्या दरबारी परतलेले असतात. त्यावेळी त्यांचे औक्षण करणाऱ्या महाराणींनी युद्धामध्ये खराब झालेल्या मावळ्यांच्या कपड्यावरुन भाष्य करतात. त्यानंतर या मावळ्यांना स्वत:चे कपडे निरमा पावडरने धुताना दाखविण्यात आलं आहे. यावरुन सोशल मीडियात शिवप्रेमींना #ApologizeAkshay हा ट्रेंड सुरु केला असून अक्षयच्या सिनेमांवर बहिष्कार टाकण्याचंही आवाहन केलं आहे.
शिवप्रेमी असाल तर ही ऍड हेटफुल म्हणून रिपोर्ट करा
— H.Mulay (Jahagirdar) (@hemantraomulay) January 5, 2020
मावळ्यांचा अपमान खपवून घेऊ नका #ApologizeAkshayhttps://t.co/kmwu1ibrx1
या जाहिरातीमुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जात असून सरकारने निरमाच्या जाहिरातीवर लवकर बंदी आणावी अशी मागणीही करण्यात आली आहे. लाखो मावळ्यांच्या रक्ताने हा महाराष्ट्र घडला आहे हे अक्षयकुमारला काय कळेल असं सांगत लवकरात लवकर माफी मागावी अन्यथा परिणामास सामोरे जा अशी धमकीही देण्यात आली आहे.
स्वराज्य आणी स्वाभिमानासाठी या मातीला रक्ताभिषेक करणार्या मराठी पोशाखातल्या मावळ्यांना कपडे धुताना दाखवुन या निरमा उद्योग आणी या कॅनेडियन अभिनेत्याने त्या सर्व वीरांचा अपमान केलाय! या कंपनीने आणि या टिनपाट अभिनेत्याने माफी मागायला हवी. #ApologizeNirma#ApologizeAkshaypic.twitter.com/WVVAkOHTma
— Aniket Nagawade (@nagawade_aniket) January 5, 2020
तुम्ही भलेही पैसे कमवन्यासाठी स्वतः नंगे नाचा कोणाला काही त्रास होणार नाही पण शिवरायांचा किंवा त्यांच्या मर्द मावळ्यांचा यापुढे असा अपमान नकोच. हे शिवभक्त कधीच सहन करणार नाही म्हणून ही जाहिरात लवकर बंद करा आणि माफी मांगा..
— Yogendra Gurve (@gurveyogendra_a) January 5, 2020
#ApologizeAkshay@akshaykumarpic.twitter.com/426hIG9eVj
ज्या मराठा साम्राज्याने दिल्लीचे तख्त राखिले
— Soham Shinde (@sohamspeaks45) January 6, 2020
त्यांच मराठा साम्राज्यावर कॅनेडियन ऍक्टर अक्षय कुमारनी विनोद करत जाहिराती केली..लाज वाटली पाहिजे 😠😡
Stop @Nirma_ltd ad immediately#ApologizeNirma#ApologizeAkshay@akshaykumar@YuvrajSambhaji@Awhadspeaks@RtMaratha@MarathaOrgpic.twitter.com/y0UrAK8eOg
महाराष्ट्रात राहून जर महाराजांच्या इतिहासाची , शूर मावळ्यांची केलेली चेष्टा मस्करी कदापि सहन केली जाणार नाही @akshaykumar यांनी याबद्दल त्वरित लेखी माफी मागावी ...@YuvrajSambhaji@Chh_Udayanraje@OfficeofUT@CMOMaharashtra@AUThackeray@RajThackeray@anilshidore@TV9Marathipic.twitter.com/yXsURBdaVy
— शिवदुर्गांचा निस्सिम भक्त विशाल (@kadamv99) January 5, 2020
ज्या मराठा साम्राज्याने दिल्लीचे ही तख्त राखिले; त्याच #मराठा साम्राज्यावर अक्षय कुमार ने विनोद करत निरमा ची जाहिरात केली आहे, @akshaykumar लवकरात लवकर माफी मागा नाहीतर, परिणामास सामोरे जा.#जाहिर_निषेधpic.twitter.com/WVDqxcpbNp
— #मराठा (@MarathaOrg) January 6, 2020