Video : बाळासाहेबांना आदरांजली वाहताना फडणवीसांनी शिवसेनेला करून दिली 'ती' आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 08:53 AM2019-11-17T08:53:39+5:302019-11-17T11:12:36+5:30
स्वाभिमान जोपर्यंत तुमचा जिवंत राहिल, तोपर्यंतच या देशाला काही चांगले दिवस येण्याची शक्यता आहे,
मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली आहे. बाळासाहेबांना आदरांजली वाहताना फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये स्वाभिमान आणि हिंदूत्वाचा बाणा कधीही न सोडण्याचा संदेश बाळासाहेबांनी दिलाय. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, माजी मुख्यमंत्र्यांनी अलगदपणे शिवसेनेला बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आठवणच बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी करून दिल्याचं दिसून येतंय.
''स्वर्गीय बाळासाहेब हे आमच्या सर्वांसाठी स्फूर्तीदायक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राचं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वैभव म्हणून बाळासाहेबांकडे पाहता येईल. बाळासाहेब हे उर्जेचा स्त्रोत होते, छोट्यातील छोट्या माणसाला बाळासाहेबांच्या विचाराने ऊर्जा मिळायची, आपल्या एका वाक्याने प्रेरीत करण्याची क्षमता आणि किमया आदरणीय बाळासाहेबांमध्ये होती, असं फडणवीस यांनी म्हटलंय.
स्वाभिमान जोपर्यंत तुमचा जिवंत राहिल, तोपर्यंतच या देशाला काही चांगले दिवस येण्याची शक्यता आहे, नाहीतर रसातळाला चाललंय. नावाला जपा, नाव मोठं करा, एकदा का नाव गेलं की परत येत नाही, असा बालासाहेबांचा संदेशपर डायलॉग असणारा व्हिडीओ मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केला आहे. हिंदू धर्माचा भगवा झेंडा, सतत-सतत, सातत्याने आसमानात फडकत राहिला पाहिजे, असा संदेशही बाळासाहेबांनी या व्हिडीओतून दिला आहे. म्हणजेच, हिंदू धर्माची आणि भगव्याची आठवण करुन देण्याचा प्रयत्न माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाळासाहेबांना आंदरांजली वाहताना केला आहे. तसेच, बाळासाहेब हे विचारांनी आणि स्मृतींनी सदैव आपल्यासोबत राहतील, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र आदरणीय बाळासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला ! pic.twitter.com/HZZERANqaW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 17, 2019
पाहा व्हिडीओ -