VIDEO - खामकर बंधूंचा चीनी फटाके न विकण्याचा निर्णय
By admin | Published: October 22, 2016 09:11 AM2016-10-22T09:11:33+5:302016-10-22T09:11:33+5:30
व्हॉटसअॅप, सोशल मीडियावर चीनी वस्तूंवर बंदी घालून चीनला अद्दल घडवा असे आवाहन करणारे मेसेजेस फिरत असतात. त्याच भावनेतून यंदाच्या दिवाळीत..
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध फटाका व्यापारी खामकर बंधुंनी यंदाच्या दिवाळीत चायनीज फटाक्यांची विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला उरी दहशतवादी हल्ल्याची पार्श्वभूमी आहे. उरी हल्ल्याचा जगभरातून निषेध झाला पण चीनने पाकिस्तानच्या नापाक कारवायांना साथ दिली. तोच राग आजही भारतीयांच्या मनात कायम आहे.
व्हॉटसअॅप, सोशल मीडियावर चीनी वस्तूंवर बंदी घालून चीनला अद्दल घडवा असे आवाहन करणारे मेसेजेस फिरत असतात. त्याच भावनेतून यंदाच्या दिवाळीत खामकर बंधुंनी चायनीज फटाके विक्रीसाठी न ठेवण्याचा निर्णय घेतला. तसा संदेशाचा फलकच त्यांनी आपल्या दुकानात लावला आहे.
शिवकाशी येथून येणा-या फटाक्यांच्या तुलनेत चायनीच फटाके १० ते १२ टक्के स्वस्त असतात. पण चीन ज्या प्रकारे पाकिस्तानची तळी उचलून धरत आहे ते मनाला अजिबात पटलेले नाही. सीमेवर जवान सर्तक असल्यामुळे आज आपण सुरक्षित आहोत. आम्ही सीमेवर जाऊ शकत नाही पण निदान जे आपल्या हातात आहे त्यातून खारीचा वाटा उचलू शकतो म्हणून चीनी फटाक्यांची विक्री न करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती संकेत खामकर यांनी दिली.
भारतीय फटाक्यांच्या तुलनेत चायनीच फटाक्यांमुळे प्रदूषणही जास्त होते असे संकेत यांनी सांगितले. दिवाळीतच नव्हे तर, गणपती, नवरात्र, निवडणुकांच्या काळात खामकर बंधूंकडून मोठया प्रमाणावर फटाके खरेदी होते.