मुंबई -घाटकोपर येथील हिंगवाला मार्केटमधील फेरीवाल्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलन सुरू केले. घाटकोपरमधील हे मार्केट गेल्या १८ महिन्यांपासून बंद असल्याने फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे पुनर्वसन करण्याची मागणी करत फेरीवाल्यांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच धंदा थाटला आहे.छत्रपती शिवाजी महाराज फेरीवाला संघाने हे आंदोलन छेडले आहे. संघटनेचे अध्यक्ष मंगेश सूर्यवंशी यांनी आत्महत्येचा प्रयत्न करत महानगरपालिकेच्या दुसर्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतलेले आहे. हिंगवाला मार्केटमध्ये 317 फेरीवाले आहेत. त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे. आंदोलन करणाऱ्या सर्व फेरीवाल्यांना ताब्यात घेत पेलीस आझाद मैदानात घेऊन जात आहेत.
Video : फेरीवाल्यांच्या आंदोलनादरम्यान अध्यक्षांनी केला आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 3:39 PM