Video : आत्महत्येसाठी तो रेल्वे ट्रॅकवर झोपला, RPF जवानाने उडी घेऊन वाचवलं
By महेश गलांडे | Published: February 26, 2021 02:38 PM2021-02-26T14:38:49+5:302021-02-26T14:42:28+5:30
विरार रेल्वे स्थानकावर गर्दी लोकल रेल्वेची वाट पहात होती. या गर्दीतून एक तरुण उडी घेऊन रेल्वे ट्रॅकवर आला. त्यानंतर, समोरुन लोकल रेल्वे येत असल्याचं पाहून त्याने चक्क ट्रॅकवर लोटांगणच घातलं.
मुंबई - राजधानी मुंबईच्यालोकलमध्ये अपघात होऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तर, कधी कधी या रेल्वेखाली येऊन आत्महत्याही केल्या जातात. मुंबईतील विरार रेल्वे स्टेशनवरच्या ट्रॅकवर आत्महत्या करण्यासाठी एक व्यक्ती आला होता. मात्र, रेल्वे पोलीसमधील जवानाने धाव घेऊन या व्यक्तीचा जीव वाचवला. यासंदर्भातील घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
विरार रेल्वे स्थानकावर गर्दी लोकल रेल्वेची वाट पहात होती. या गर्दीतून एक तरुण उडी घेऊन रेल्वे ट्रॅकवर आला. त्यानंतर, समोरुन लोकल रेल्वे येत असल्याचं पाहून त्याने चक्क ट्रॅकवर लोटांगणच घातलं. त्यामुळे, समोरील गर्दीने आराडाओरड आणि गोंधळ सुरु केला. मात्र, कुणीही धावत जाऊन त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला नाही. नेहमीप्रमाणे येथेही खाकी वर्दी धावून आल्याचं दिसलं. पलीकडील प्लॅटफॉर्मवरुन एक रेल्वे पोलीस धावत रेल्वे ट्रॅकवर आला आणि त्याने ट्रॅकवर झोपलेल्या व्यक्तीला बाजून सारले. त्यावेळी, काहीजण रेल्वे पोलीस जवानाच्या मदतीला आले होते. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे.
#WATCH: RPF personnel averted a suicide attempt when they dragged a man out of railway tracks where he was lying down as a train was approaching him, at Virar railway station in Mumbai. The man was allegedly disturbed by the demise of his mother. (24.02)
— ANI (@ANI) February 26, 2021
(Souce: Indian Railways) pic.twitter.com/gbp5cn5WXw
आईचे निधन झाल्याचे दु:ख पचवू न शकल्यामुळे संबंधित व्यक्ती तणावात होती, त्यामुळेच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल या व्यक्तीने उचलले होते. सुदैवाने देवदूत बनून आरपीएफ जवान रेल्वे ट्रॅकवर धावला अन् त्या व्क्तीचा जीव वाचला. त्यानंतर, उपस्थित गर्दीतील लोकांनी आरपीएफ जवानाच्या धाडसाचे आणि दाखवलेल्या तत्परतेचं कौतुक केले.