मुंबई - वन्यजीव प्राण्याच्या जीवनाची साखळी असते. लहानशा किड्यांपासून ते वाघांपर्यंत हे प्राणी एकमेकांवर उजजिवीकेसाठी अवलंबून असतात. वाघ, बिबट्या या प्राण्यांना आपलं पोट भरण्यासाठी शिकाराच्या शोधात जंगलात, रानावनात फिरावं लागतं. सावज गाठण्यासाठी दबा धरुन बसावं लागतं. तर, या हिंस्र प्राण्यांपासून बचाव करण्यासाठी हरीण, काळवीट, गाय, बैल यांसारखे प्राणी सावध असतात. मात्र, तरीही निसर्गाचे हे चक्र चालते. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी असाच एक अमेझिंग हंटींगचा व्हिडिओ शेअर केला आहे.
आव्हाड यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत आपल्या अन्नाच्या शोधात एका रानावनात आलेलं काळवीट दिसत आहे. तर, काळवीट हे आपलं अन्न असल्याने त्या सावजाची शिकार करण्यासाठी एक बिबट्या हळूहळू पावलं टाकून सावधगिरीने शिकार करण्याचा प्रयत्न करत आहेत. एका झाडाजवळ उभा राहून खात असलेल्या काळविटाला पाहत बिबट्या त्याच्याकडे हळूवार धाव घेतो. लपत-लपत झाडाच्यादिशेने आगेचूक करतो. या काळविटालाही याची भनक लागते. त्यामुळे, तेही इकडे-तिकडे पाहत चरताना दिसून येत आहे.