Join us

Video : मन अस्वस्थ करणारा प्रकार; नराधमांच्या भीतीने मुलीला साखळीने बांधून ठेवते आई !

By पूनम अपराज | Published: February 23, 2019 2:58 PM

ज्या चिमुकलीचं खेळण्या - बागडण्याचं वय आहे, तिला नराधमांमुळे साखळदंडात आपलं बालपण घालवावं लागलं. 

ठळक मुद्देसायन येथील पंजाब कॉलनीच्या फुटपाथवर गेल्या अनेक वर्षांपासून हे कौर कुटुंब राहत आहे.मातेने चक्क साखळदंड आपल्या मुलीला कोणीही घेऊन जाण्यापासून वाचवू शकतो त्यामुळे असा मार्ग तिने स्वीकारला. या साखळदंडात ठेवण्याचे कारण मुलीच्या आईच्या तोंडून ऐकून सारेजण चक्रावून गेले. 

मुंबई - मुंबईतील सायन परिसरात मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. आपली चिमुकली समाजातील नराधमांपासून सुरक्षित राहावी म्हणून फुटपाथवर राहणाऱ्या एका आईने काळजीपोटी मुलीला साखळदंडात बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना सायन परिसरातील उघडकीस आली आहे. ज्या चिमुकलीचं खेळण्या - बागडण्याचं वय आहे, तिला नराधमांमुळे साखळदंडात आपलं बालपण घालवावं लागलं. 

काही दिवसांपूर्वी माहीम परिसरात एका पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार करण्यात आला होता आणि त्यानंतर तिची निर्घृण हत्यासुद्धा करण्यात आली होती. अशा अनेक घटना देशभरात घडत आहेत. या समाजकंटकांमुळे आपल्या ७ वर्षांच्या चिमुरडीला साखळदंडाने बांधून ठेवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. या मुलीच्या आईचे सपना कौर असं नाव आहे. या महिलेवर नेटिझन्सने अनेक नाना तऱ्हेच्या कॉमेंट्सही केल्या. अनेकांनी तिच्यावर टीका देखील केली होती. मात्र, तिने मुलीला का बांधून ठेवलं होतं? याचं कारण समोर आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे. ‘आपल्या मुलीच्या वाट्याला कोणत्याही समाजकंटकाची सावली पडू नये. म्हणून मी तिला साखळीने बांधून ठेवलं होतं’, अशी स्पष्टोक्ती या महिलेने दिली आहे. भारतात बेटी बचाओ, बेटी पढाओचा संदेश देणाऱ्या सरकारने चिमुकल्यांवर लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षेची तरतूद केली आहे खरी. पण त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. 

सायन येथील पंजाब कॉलनीच्या फुटपाथवर गेल्या अनेक वर्षांपासून हे कौर कुटुंब राहत आहे. अनेक नराधम, समाजकंटक आणि गर्दुल्यांचा भीतीने हे कुटुंब दिवस काढत होत. मात्र माहीममधल्या त्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचाऱ्याने या मातेचे काळीज हेलावून गेलं. माहीममधली ती चिमुरडी देखील फुटपाथवर आपल्या आई आणि अपंग वडीलांसोबत राहत होती. त्यामुळे असा प्रकार आपल्या मुलीच्या बाबतीत घडू नये म्हणून या मातेने चक्क साखळदंड आपल्या मुलीला कोणीही घेऊन जाण्यापासून वाचवू शकतो त्यामुळे असा मार्ग तिने स्वीकारला. 

या कुटुंबात ६५ वर्षांची एक वृद्ध महिला (आजी), तिचा ४० वर्षांचा अपंग मुलगा, पतीने सोडून दिलेली २५ वर्षांची मुलगी आणि ७ वर्षांची नात असे सदस्य आहेत. या साखळदंडाची चावी आजी आणि आईकडे असते तिला काही वेळ रिकामी देखील केलं जातं. मात्र, पुन्हा तिच्या पायात बेड्या पडतात. ही चिमुरडी थोडी खोडकर आहे म्हणून ती नजरेसमोरून कुठेही जाऊ नये यासाठी ही वेदनादायक खबरदारी घेण्यात आली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर काही लोकांनी आणि पोलिसांनी तिथे धाव घेतली आणि मुलीला या साखळदंडातून मुक्त केलं आहे. मात्र, या साखळदंडात ठेवण्याचे कारण मुलीच्या आईच्या तोंडून ऐकून सारेजण चक्रावून गेले. 

टॅग्स :मुंबईपोलिसलैंगिक शोषण